शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

तिरोड्यात न.प.ची अनधिकृत शाळा

By admin | Updated: September 11, 2015 02:02 IST

तिरोडा नगर परिषदेने शिक्षण विभागाची परवानगी न घेताच अनधिकृतपणे इंग्रजी माध्यमातून प्राथमिक शाळा सुरू केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

आशिर्वाद कुणाचे? : मंजुरी एकाची, कारभार चालतो दुसऱ्या शाळेचा, पालकांकडून उकळले जातेय शुल्क !गोंदिया : तिरोडा नगर परिषदेने शिक्षण विभागाची परवानगी न घेताच अनधिकृतपणे इंग्रजी माध्यमातून प्राथमिक शाळा सुरू केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. एवढेच नाही तर शहरात इतरत्र न.प. शाळेचा फलक लावून प्रत्यक्षात त्यात खासगी शाळा सुरू केल्याचा खळबळजनक प्रकार गटशिक्षणाधिकाऱ्याच्या निदर्शनास आला आहे.मराठी माध्यमातील शाळांची दयनीय अवस्था व रोडावत चाललेली विद्यार्थी संख्या पाहता तिरोडा नगर परिषदेने लिटील बडर््स म्युनिसिपल कॉन्व्हेंट नावाने पूर्व माध्यमिक शाळा सुरू केली. जे गरीब विद्यार्थी कॉन्व्हेंट शाळेत शिक्षण घेऊ शकत नाहीत त्यांना इंग्रजी माध्यमातून चांगले शिक्षण मिळावे, असा यामागे हेतू होता. तिरोडा नगर पालिकेच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुकही झाले. मात्र यंदा शाळेत अनधिकृतपणे पहिला व दुसरा वर्ग सुरू करण्यात आला. विशेष म्हणजे याकरिता शिक्षण विभागाची परवानगी घेण्यात आलेली नाही.दुसरा अफलातून प्रकार असा की तिरोडा शहरातील जनता बँकेच्या वर लिटिल बडर््स म्युनिसिपल कॉन्व्हेंटचा फलक असलेली एक शाळा सुरू आहे. गटशिक्षणाधिकारी मांढरे यांनी १३ आॅगस्ट १५ ला या शाळेला भेटी दिली असता विद्यार्थी व शिक्षकांनी शाळेचे नाव ‘लिटील फ्लॉवर’ असल्याचे सांगितले मात्र कार्यालयात ‘लिटील बडर््स’ सांगण्यात आले. त्यामुळे गटशिक्षणाधिकारी देखील चक्रावून गेले. त्यांनी लिटील फ्लॉवर शाळेला पत्र क्र. पंसति /शिक्षण / का.नो./ ९४/२०१५ दि.१४.८.२०१५ नुसार खुलासा मागविला व शाळेला मान्यता प्राप्त असल्याची प्रत पाच दिवसात सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच ‘लिटिल बडर््स ’ शाळेला देखील निर्देश दिले. लिटिल बडर््स शाळेकडून पत्र क्र.नपति/लि.बर्ड मु.का./क्यू/२०१५ दि.१७.८.२०१५ नुसार उत्तर देण्यात आले. यात प्राथमिक वर्गांची परवानगी नसल्याचे सांगण्यात आले आहे.लिटील फ्लॉवर शाळेने आपल्याकडे फक्त पूर्व प्राथमिक शाळा असल्याचे उत्तर गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. नगर पालिकेची लिटिल बडर््स शाळा न.प.च्या मालकीच्या डॉ.छत्रपती दुबे शाळेच्या प्रशस्त इमारतीत भरते. मग जनता बँकेच्यावर पालकांकडून अवाढव्य फी उकळून न.प.कान्व्हेंटचा फलक लावून प्राथमिक शाळा कशी काय सुरू आहे? हा अनाकलनिय प्रश्न चिन्ह आहे. न.प.च्या कॉन्व्हेंटचा फलक वापरण्याची परवानगी लिटिल फ्लॉवर शाळेला कुणी दिली असावी? यामागे कुणाचा हात असावा? या सर्व गोंधळात नेमके काय गौडबंगाल आहे हे शोधण्याची जबाबदारी आता शिक्षण विभागाची असून ते काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिले वर्ग बंद करण्याचे आदेशगटशिक्षणाधिकाऱ्यांनी ४ सप्टेंबरला पत्र देवून लिटील बडर््स शाळेतील प्राथमिक वर्ग १ व २ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे नगर पालिकेने प्राथमिक वर्ग सुरू करण्याकरिता शासनाकडे रितसर नमुन्यात प्रस्ताव देखील सादर केलेला नाही. याचा अर्थ सदर शाळा अनधिकृत असून विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली आहे. १५ दिवसांत प्राथमिक शाळा बंद न केल्यास फौजदारी कार्यवाही प्रस्तावित करण्याचे नमूद केले आहे.- आकारल्या जातेय ट्यूशन फीएका पालकाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर लिटिल फ्लॉवर शाळेत दुसऱ्या वर्गाकरिता चार हजार रुपये ट्युशन फिस भरल्याची पावती दाखविली. जर सदर शाळेला प्राथमिक वर्गांची मान्यता नाही तर ट्यूशन फिस कशाची घेतली जाते? याचा अर्थ या शाळेतही अनधिकृतपणे इंग्रजी माध्यमातून प्राथमिक शाळा सुरू आहे.खासगी शाळा, नगर पालिका कॉन्व्हेंटचा फलक, अनधिकृत वर्ग या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी व विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा हा घृणास्पद प्रकार बंद व्हावा, अशी मागणी पालकांनी केली आहे.