शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

नळयोजनेच्या पाईप लाईनचे विनापरवानगी खोदकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 00:06 IST

तिरोडा तालुक्यातील मुरमाडी ग्रामपंचायत अंतर्गत नळ योजनेचे काम सुरू असून हे काम जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे. मात्र या नळ योजनेसाठी पाईप लाईन वन जमीन आणि शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनीतून टाकली जात आहे.

ठळक मुद्देग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा प्रताप : शेतकऱ्याची विभागीय आयुक्तांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तिरोडा तालुक्यातील मुरमाडी ग्रामपंचायत अंतर्गत नळ योजनेचे काम सुरू असून हे काम जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे. मात्र या नळ योजनेसाठी पाईप लाईन वन जमीन आणि शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनीतून टाकली जात आहे. यासाठी या दोघांची परवानगी घेण्यात आली नसून बेकायदेशीरपणे काम केले जात असल्याची तक्रार शेतकऱ्याने विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.प्राप्त माहितीनुसार नरेश धनराज ठवकर यांची निलागोंदी येथे सर्वे क्रमाक ६३ मध्ये ०.१७ हेक्टर शेती आहे. त्यांच्या जमिनीवर पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीचे बांधकाम करण्यात आले आहे. विहिरीसाठी खोदकाम करताना जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने सदर शेतकºयाला सुध्दा विश्वासात घेतले नाही. ठवकर यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी याची संबंधित विभागाकडे तक्रार केली. तेव्हा पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर जागा तुमच्या मालकीचे नसल्याचे सांगितले. त्यामुळे ठवकर यांनी भूमि अभिलेख विभागाकडे पैसे भरुन जमिनीची मोजणी करुन घेतली. तेव्हा पाणी पुरवठा विभागाने तयार केलेली विहीर ही ठवकर यांच्या शेतात असल्याचे स्पष्ट झाले. मात्र यानंतरही पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी ऐकायला तयार नसल्याने ठवकर यांनी जि.प.पाणी पुरवठा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना वकीलामार्फत नोटीस देऊन उत्तर मागीतले आहे. नियमानुसार पाणी पुरवठा विभागाने मुरमाडी येथील नळ योजनेसाठी विहिरीचे खोदकाम आणि पाईप लाईन टाकतांना सदर शेतकऱ्याला विश्वासात घेण्याची गरज होती.शिवाय विहिरीचे खोदकाम त्यांच्या जागेत करीत असताना त्याची लेखी परवानगी आणि तेवढ्या जागेचा मोबदला ठवकर यांना देणे अपेक्षीत होते. मात्र तसे न करता शेतकºयाला टोलाटोलवीचे उत्तर देऊन त्याची दिशाभूल करण्यास सुरूवात केली आहे.पाणी पुरवठा विभाग आणि ग्रामपंचायतने केलेले काम बेकायदेशीर असून याविरुध्द न्यायालयात जाण्याचा इशारा ठवकर यांनी दिला आहे. मुरमाडी येथील पाणी पुरवठा योजनेच्या कामाला आपला विरोध नाही. पण आपल्या शेत जमिनीत पाईप लाईन आणि विहिरीचे खोदकाम करताना आपली परवानगी घेणे आवश्यक होते. मात्र तसे न करता उलट पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आपल्याला भिती दाखवित असल्याचे नरेश ठवकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.वन कायद्याचे उल्लघंनपाणी पुरवठा विभागाने मुरमाडी येथील नळ योजनेच्या कामासाठी पाईप लाईन टाकताना वन विभागाच्या राखीव जागेत खोदकाम केले आहे.हे खोदकाम सुध्दा बेकायदेशीर असून याची उपवनसंरक्षकाकडे तक्रार करण्यात आली आहे.त्याची चौकशी करण्याचे निर्देश सुध्दा वन विभागाच्या अधिकाºयांनी दिले आहे.