शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

‘उमरझरी’चे पाणी वडेगावला पोहोचलेच नाही

By admin | Updated: January 20, 2015 22:37 IST

सडक-अर्जुनी तालुक्यातील सर्वात मोठा मध्यम प्रकल्प म्हणून उमरझरी प्रकल्पाची ओळख आहे. या प्रकल्पाची निर्मिती होवून २५ वर्षे पूर्ण झालीत. पण त्या प्रकल्पाचे पाणी वडेगावपर्यंत पोहोचलेच नाही.

राजेश मुनीश्वर - सडक-अर्जुनीसडक-अर्जुनी तालुक्यातील सर्वात मोठा मध्यम प्रकल्प म्हणून उमरझरी प्रकल्पाची ओळख आहे. या प्रकल्पाची निर्मिती होवून २५ वर्षे पूर्ण झालीत. पण त्या प्रकल्पाचे पाणी वडेगावपर्यंत पोहोचलेच नाही. त्यामुळे सिंचनाची सोय नसलेले वडेगाववासी आजही उमरझरी मध्यम प्रकल्पाच्या पाण्याची वाट पाहात आहेत. उमरझरी मध्यम प्रकल्पाचे क्षेत्रफळ ७०० हेक्टर क्षेत्रात विस्तारीत आहे. या तलावाचे सिंचन एक हजार ४७० हेक्टर क्षेत्रात होईल, असे नियोजन असल्याची माहिती आहे. पण तलावात पाणीसाठा राहात नसल्यामुळे फक्त २०० हेक्टर क्षेत्रात सिंचन होत असल्याची माहिती तेथील कर्मचाऱ्याने दिली. उमरझरीचे पाणी हे शेवटच्या टोकापर्यंत पोहोचावे यासाठी कोदामेडी उत्तरिका ही खजरी ते कोदामेडीपर्यंत सात किलोमीटर तयार करण्यात आली आहे. उत्तरिका तयार करण्यासाठी गरीब शेतकऱ्यांची शेती गेली, पण उपयोग काहीच होत नसल्याचे दिसत आहे. ‘नाव सोनाबाई, आणि हाती कथलाचा वाडा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. उमरझरी मध्यम प्रकल्पाचा मुख्य कालवा हा १२ कि.मी.चा उमरझरी ते खजरी या गावापर्यंत खोदण्यात आला आहे. मुख्य कालव्यामुळे खजरी, कोहळीटोला व चिरचाडी या तीन गावातील ५६ हेक्टर क्षेत्रात सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात रबी पिकाला सिंचनाची सोय करण्यात आली होती. यावर्षी उमरझरी मध्यम प्रकल्पात पाणीसाठा कमी असल्यामुळे कोणत्याही गावाला रबी पिकासाठी पाणी देण्यात येणार नाही, अशी माहिती उमरझरी मध्यम प्रकल्पाचे शाखा अभियंता मंदिले यांनी दिली आहे.या प्रकल्पाचे खरे नियोजन झाले असते तर तालुक्यातील बहुतांश गावे सुजलाम-सुफलाम झाली असती, पण नियोजन नसल्यामुळे उमरझरीचे पाणी वडेगाव पर्यंत पोहचू शकले नाही. सिंचनाचे पाणी न पोहोचल्याने हजारो एकर क्षेत्र सिंचनापासून वंचित आहे. वडेगाववासीयांना पाणी न मिळाल्यामुळे फक्त खरीप पिके घेऊनच समाधान मानावे लागत आहे. निसर्गाने खरीप हंगामास दगा दिल्यास तेही पीक काही वेळा एका पाण्याने जाण्याचे चित्र पहावयास मिळते. उमरझरी मध्यम प्रकल्पाचे मोठे नहर तयार करुन शेतकऱ्यांची शेती त्या नहरात गेली आहे. शेती गेली पण एका पैशाचाही फायदा कोदामेडी उपकालव्याच्या लगत शेतकऱ्यांना मिळालेला नाही. फक्त मोठमोठे नहर बांधून ठेवले आहेत. त्या उपकालव्यांना एकदाही पाणी न सोडल्याने त्या कालव्यांची दुरवस्था झाली आहे. नहरात ठिकठिकाणी झाडे व गवत वाढले आहे. वडेगावच्या दिशेने येणारा लघुकालवा हा डोंगरगाव/खजरी गावाजवळ येवून थांबला आहे. या लघुकालव्यामुळे वडेगाववासीयांची १५० हेक्टर क्षेत्रात रबी पिके झाली असती. पण लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळे हा लघुकालवा वडेगावकडे सरकलाच नाही. २५ वर्षापूर्वी जेव्हा मध्यम प्रकल्पाचे काम सुरू होते, तेव्हा वडेगावला पाणी पोहचणार, अशी चर्चा होती. वडेगाववासीयांच्या शेतीला चांगले दिवस येतील असे स्वप्न रंगविले जात होते.