शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उज्ज्वला पुन्हा चुलीवर, कनेक्शन मोफत, पण गॅस भरणार कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 05:00 IST

कोणतीही अनामत रक्कम न भरता अल्प उत्पन्न कुटुंबांना गॅस कनेक्शन मिळणार आहे. कनेक्शन जरी मोफत मिळणार असेल तरी गॅस सिलिंडर भरण्यासाठी ९०५ रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांना सिलिंडर भरून आणणे आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे या योजनेच्या अनेक लाभार्थ्यांनी गॅस सिलिंडर भरणे बंद केले असून पुन्हा चुलीकडे मोर्चा वळविला आहे. दरवाढ आणि केंद्र सरकारच्या धोरणामुळे ही योजना फसल्याचे चित्र आहे. 

अंकुश गुंडावारलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  केंद्र सरकारने चूलमुक्त भारताचे स्वप्न साकारण्यासाठी गोरगरीब लाभार्थ्यांना उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शनचे वाटप केले. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ९९ हजार लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. मात्र मागील दीड वर्षात गॅस सिलिंडरच्या किमती नऊशे रुपयांवर पोहोचल्या आहेत. त्यामुळे गोरगरीब लाभार्थ्यांना गॅस सिलिंडर भरून घेणे अवघड झाले आहे. महागाईमुळे त्या पुन्हा चुलीकडे वळल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे पहिल्या टप्प्यातील ही योजना फसली असताना आता केंद्र सरकारने पुन्हा उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला. यात काही अटींमध्ये सवलत देण्यात आली आहे. कोणतीही अनामत रक्कम न भरता अल्प उत्पन्न कुटुंबांना गॅस कनेक्शन मिळणार आहे. कनेक्शन जरी मोफत मिळणार असेल तरी गॅस सिलिंडर भरण्यासाठी ९०५ रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांना सिलिंडर भरून आणणे आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे या योजनेच्या अनेक लाभार्थ्यांनी गॅस सिलिंडर भरणे बंद केले असून पुन्हा चुलीकडे मोर्चा वळविला आहे. दरवाढ आणि केंद्र सरकारच्या धोरणामुळे ही योजना फसल्याचे चित्र आहे. 

दरवाढीने गॅस सिलिंडरचा वापर झाला कमी n मागील दीड वर्षांपासून गॅस सिलिंडरच्या किमतीत सातत्याने वाढ केली जात आहे. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. तर गोरगरीब नागरिकांनी तर गॅस सिलिंडरचा वापर बंद केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटल्याचे चित्र आहे. गॅस सिलिंडरवरील अनुदानाची रक्कम सुध्दा शासनाने कमी केले आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरसाठी ९०० रुपये मोजल्यानंतरही अनुदानापोटी केवळ २० ते २५ रुपये जमा केले जात आहे. अनेकांनी तर जंगलातून सरपण आणून पुन्हा चुलीवरच स्वयंपाक सुरु केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे चूल आणि धूर मुक्तीचे स्वप्न केवळ स्वप्न असल्याचे सिध्द होत आहे. गॅस सिलिंडरची दरवाढ मागे घेण्याची मागणी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांकडून होत आहे. 

सिलिंडर भरणे कसे परवडणार?शासनाने आम्हाला दोन वर्षांपूर्वी चुलीपासून मुक्ती मिळवून देण्यासाठी उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत गॅस कनेक्शन दिले. सुरुवातीला गॅस सिलिंडरच्या किमती कमी होत्या त्यामुळे ते परवडत होते. पण मागील वर्षभरापासून गॅस सिलिंडरच्या किमती भरमसाट वाढल्याने त्याचा वापर आम्ही बंद केला असून चुुलीवर स्वयंपाक करीत आहोत. - देवका मडावी, लाभार्थीउज्ज्वला योजनेंतर्गत गॅस सिलिंडर मिळाल्याने आनंद झाला होता. चूल आणि धूर यापासून मुक्ती मिळणार असे वाटत होते. पण गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे मागील वर्षभरापासून आम्ही गॅसचा वापर करणेच बंद केला. जंगलात सरपण आणून त्यावरच स्वयंपाक करीत आहोत. - विशाखा उमक, लाभार्थीकेंद्र शासनाने एकीकडे उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत गॅस सिलिंडरचे वाटप करून चूृल आणि धूरमुक्त होण्याचे स्वप्न दाखविले. तर दुसरीकडे गॅस सिलिंडरची दरवाढ करून गोरगरीब लाभार्थ्यांना पुन्हा चुलीकडे वळण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे सरकारचे नेमके धोरण काय आहे हे कळण्यास मार्ग नाही.- शेवंता राऊत, लाभार्थी

 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर