समितीची मदत : डॉक्टरसह चौघांवर गुन्हागोंदिया : नवजात गोंडस बाळाला कमजोर असल्याचे दाखवून त्याला उपचाराच्या नावावर दुसऱ्या दवाखान्यात नेले. त्यानंतर त्या बाळाला दत्तक घेण्याचा दत्तकनामा बळजबरीने लिहून घेणाऱ्या डॉक्टरासह चौघांवर गोंदिया शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.आरोपीमध्ये डॉ.राकेश गुप्ता, नरेश गुप्ता, राहूल यदूवंशी व सुषमा यदूवंशी या चौघांचा समावेश आहे. मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील खैरलांजी तालुक्याच्या घुबडगोंदी येथील सुरेंद्र बळीराम बघेले यांच्या पत्नीची प्रसूती डॉ. बाहेकर नर्सिंग होम येथे झाली. गुरुवारी दुपारी ४ वाजता सामान्य प्रसुतीतून जन्माला आलेले बाळ कमजोर आहे त्याला बालरोग तज्ज्ञाकडे उपचाराची गरज आहे असे सांगून या चार आरोपींनी त्या बाळाला जीवन ज्योती नर्सिंग होम येथे भरती करायला नेले. सोबतच त्यांच्याकडून दत्तकनामा लिहून घेतला. मुलगा परत पाहिजे असे सुरेंद्र बघेले म्हणाल्यावर त्याच्या उपचारासाठी अडीच लाख रुपये खर्च झाले आहेत. मुलगा परत मिळणार नाही असे म्हणाले. हे प्रकरण सुरेंद्र बघेले यांनी बालकल्याण समिती गोंदिया यांच्याकडे नेले. बाल कल्याण समिती गोंदियाने तो मुलगा आई-वडीलांना परत दिला.
नवजात बाळाला बळकावण्याचा प्रकार
By admin | Updated: March 9, 2016 02:47 IST