शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
2
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
3
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
4
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
5
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
6
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
7
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
8
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
9
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
10
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
11
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
12
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
13
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
14
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
15
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
16
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
17
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
18
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
19
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
20
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद

दुचाकीस्वार युवकांची वाहतूक पोलिसांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2017 02:04 IST

सद्रक्षणात खलनिग्रहणाय’ या ब्रिद वाक्याप्रमाणे नागरिकांच्या संरक्षणासाठी कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर

तीन तरूणांवर गुन्हा : आठवडाभरातील दुसरी घटना गोंदिया : ‘सद्रक्षणात खलनिग्रहणाय’ या ब्रिद वाक्याप्रमाणे नागरिकांच्या संरक्षणासाठी कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर आता हल्ले होत आहेत. आठवडाभरात पोलिसांवर दुसरा हल्ला होण्याची घटना मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास गोंदियात घडली. एमजले नावाचे पोलीस कर्मचारी लाजवंती दमडुलाल राठोड (३५) ब.नं.४७४ यांच्यासोबत आंबेडकर चौकात कर्तव्यावर होती. दरम्यान एमएच ३५, क्यू १०७६ या दुचाकीवर ट्रीपल सीट जाणाऱ्या तरूणांना या वाहतूक पोलिसांनी थांबविले. यावेळी त्या तरूणांना पकडण्याचा प्रयत्न एमजले यांनी केला असता त्यांना दगडाने मारून जखमी केले. एवढेच नाही तर अश्लील हातवारे करून न थांबता पळून गेले. पोलीस कर्मचाऱ्यांनी दुचाकीने पाठलाग केला असता काही अंतरावर दुचाकीस्वार तीनही तरुणांना पोलीस कर्मचाऱ्यांनी पकडले. दरम्यान कारवाईमध्ये आडकाठी आणत तिन्ही युवकांनी पोलीस कर्मचाऱ्यांसोबत भांडण केले. त्यातच पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. भरचौकात पोलीस कर्मचाऱ्यांसोबत सुरू असलेल्या तीन युवकांच्या भांडणामुळे काही नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तिघांपैकी दोन युवकांनी संधी साधून पळ काढला. एक युवक नागरिकांच्या मदतीने पोलीस कर्मचाऱ्यांच्या हाती लागला. आरोपी युवकाला गोंदिया शहर पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांना मारहाण करणाऱ्या आरोपीत साकीब अकबर शेख (१९), हुजेफा निशादअली बाबीनवाले (१९) दोन्ही रा.नूरी मस्जीद मागे सिव्हील लाईन गोंदिया व राहूल संजय गवळी (२०) रा. गरीब नवाज चौक, संजय नगर गोविंदपूर गोंदिया अशी आरोपींची नावे आहेत. या घटनेत वाहतूक पोलीस कर्मचारी एमजले यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. पोलिसांनी या घटनेची तूर्त दाखल घेत ताब्यात असलेल्या आरोपीचा कसून समाचार घेतला. गोंदिया शहर पोलिसांनी पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करून घटनास्थळावरून पळ काढणाऱ्या दोन्ही युवकांना ताब्यात घेतले. सदर प्रकरणात आरोपीविरूध्द भादंविच्या कलम ३५३, ३३३, ५०९, ५०४, ३४ सहकलम १२८, १७७, १३२ (अ), १४६,१९६ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ७ एप्रिल रोजी अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान काही लोकांनी पोलिसांना मारहाण केली होती. पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने गोंदिया शहरात सर्वसामान्य नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गोंदिया पोलिसांनी गुन्हे प्रवृत्तीच्या लोकांवर वचक बसविण्यासाठी योग्य पाऊल उचलावे अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होऊ लागली आहे. (तालुका प्रतिनिधी)