शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

झेडपी सभापती निवडणुकीत टू बाय टू पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 22:25 IST

जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने समविचारी पक्षासोबत आघाडी न करता भाजपासोबत अभद्र युती करुन जि. प. मध्ये सत्ता स्थापन केली.

ठळक मुद्देपदे चार आणि दावेदार अनेक : मोर्चेबांधणीला सुरुवात

आॅनलाईन लोकमतगोंदिया : जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने समविचारी पक्षासोबत आघाडी न करता भाजपासोबत अभद्र युती करुन जि. प. मध्ये सत्ता स्थापन केली. आता ३० जानेवारीला विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीत सुध्दा हेच समीकरण कायम राहणार आहे. एकूण चार सभापती पदांपैकी दोन काँग्रेस व दोन भाजपाकडे जाणार आहे. त्यामुळे झेडपीत हातात कमळानंतर आता टू बाय टू चा पॅटर्न चालणार आहे.राज्यातच नव्हे तर देशभरात भाजप विरुध्द काँग्रेस असे चित्र असताना गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसने भाजपासोबत अभद्र युती करुन जि.प.मध्ये सत्ता स्थापन केली. काँग्रेसचे १६ आणि राष्टÑवादी काँग्रेसचे २० सदस्य असे संख्याबळ जि. प. मध्ये आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन सहजपणे सत्ता स्थापन करु शकले असते. मात्र लोकसभा आणि विधान परिषद निवडणुकीपासून या दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला आहे. तो अद्यापही कायम आहे.त्यामुळे राष्टÑवादी काँग्रेससोबत आघाडी करुन जि.प.मध्ये सहज सत्ता स्थापन करणे शक्य असताना केवळ राष्टÑवादी काँग्रेसला जि.प.तील सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने भाजपासोबत अभद्र युती करुन सत्ता स्थापन केल्याची बाब आता लपून राहिलेली नाही. या निवडणुकीदरम्यान केवळ तत्वांसाठी निष्ठा बाजुला ठेवल्याचे चित्र दिसून आले. त्यानंतर आता ३० जानेवारीला जि. प. च्या महिला व बालकल्याण, समाज कल्याण, कृषी व शिक्षण सभापतीपदासाठी निवडणूक होणार आहे. यासाठी काँग्रेस व भाजपाच्या जि. प. सदस्यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांकडे फिल्डींग लावली आहे. काँग्रेस व भाजपच्या जि.प.तील फार्म्युल्यानुसार दोन सभापती पदे काँग्रेस व दोन सभापती पदे भाजपाकडे जाणार आहेत. सभापतीपदासाठी रमेश अंबुले, लता दोनोडे, सरिता कापगते, माधुरी कुमरे, गिरीष पालीवाल, रजनी कुंभरे, मंदा कुंभरे, विश्वजीत डोंगरे, शोभेलाल कटरे यांची नावे सध्या चर्चेत आहे. एकूण पदे चार आणि त्यासाठी दावेदार दहा ते बारा असल्याने दोन्हीे पक्ष्यांचे स्थानिक नेते यावर कुठला तोडगा काढतात याकडे लक्ष लागले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजुर्नी मोरगाव, सडक अर्जुनी, तिरोडा आणि गोरेगाव या तालुक्यातील सदस्यांचा सभापतीपदासाठी प्राधान्याने विचार केला जाणार असून जवळपास चार नावे देखील निश्चित झाल्याचे बोलल्या जाते. मात्र नावे आत्ताच जाहीर केल्यास काही सदस्य दुखावले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ३० जानेवारीला ती जाहीर केली जाणार आहे.झेडपी पॅटर्नचे दिल्ली दरबारी पडसादजि.प.अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपासोबत अभद्र युती करुन सत्ता स्थापन केली. याचे पडसाद दिल्ली दरबारी उमटले असून पक्ष श्रेष्ठींनी याची दखल घेतल्याची माहिती आहे. या अभद्र युतीमुळे काही निष्ठावान कार्यकर्ते दुखावले असून त्यांनी आपली नाराजी वरिष्ठांजवळ व्यक्त केल्याचे बोलल्या. त्यामुळे पक्ष श्रेष्ठी याबाबत काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.भाजपचे कार्यकर्तेही नाराजजि.प.मध्ये काँग्रेसपेक्षा भाजपाचे संख्याबळ अधिक असताना भाजपाने अध्यक्षपद काँग्रेसला दिले. तर अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीदरम्यान अभद्र युती केल्याने भाजपचा एक स्थानिक नेता व काही कार्यकर्ते दुखावले आहेत. काही कार्यकर्त्यांनी अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या निवडणुकीदरम्यान ही नाराजी देखील बोलून दाखविली होती. मात्र मुंबईतून आदेश असल्याने कुणाचेच चालले नाही.