शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
5
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
6
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
7
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
8
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
9
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
10
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
11
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
12
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
13
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
14
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
15
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
16
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
17
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
18
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
19
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
20
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?

पिकअपच्या धडकेत दोन विद्यार्थी ठार, एक गंभीर ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:31 IST

सडक अर्जुनी : भरधाव पिकअप वाहनाने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत दोन कनिष्ठ विद्यालयीन विद्यार्थी ठार झाले, तर एक विद्यार्थी गंभीर ...

सडक अर्जुनी : भरधाव पिकअप वाहनाने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत दोन कनिष्ठ विद्यालयीन विद्यार्थी ठार झाले, तर एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला. बुधवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास गोंदिया-कोहमारा मार्गावरील खजरीजवळ हा अपघात झाला.

तुषार बीरजलाल शिवणकर (वर्ग ११, रा. मुरदोली) व शुभम नंदकुमार भिमटे (वर्ग ११, रा. मुंढरीटोला) असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. तर प्रवीण संतोष कटरे (रा. डव्वा) असे जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

आदिवासी विकास हायस्कूल खजरी येथील तीन विद्यार्थी मोटारसायकलने विद्यालयात जात असताना कोहमारा ते गोंदिया मार्गाने जात असलेल्या मालवाहक पिकअपने (क्र. एनएच २० सीटी ६०१८) त्यांना धडक दिली. यात तुषार बीरजलाल शिवणकर, रा. मुरदोली व शुभम नंदकुमार भिमटे, रा. मुंढरीटोला या विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रवीण संतोष कटरे (रा. डव्वा) हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी गोंदिया येथील सहयोग हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच आदिवासी विकास हायस्कूल खजरी येथील शिक्षक व गावकऱ्यांनी धाव घेऊन विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केले. पिकअप चालक फरार झाला. याप्रकरणी डुग्गीपार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भुरले करीत आहेत.

.......

वाहतूक पोलीस हेल्मेट चेक करण्यात व्यस्त

गोंदिया-काेहमारा मार्गावरील अपघातांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून प्रचंड वाढ झाली आहे. या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ राहते. शिवाय अनेक शाळा आणि महाविद्यालये रस्त्यालगत आहेत. मात्र या ठिकाणी वाहतूक शिपाई अथवा ब्रेकर नसल्याने अपघातांची मालिका सुरुच आहे. वाहतूक पोलिसांचे लक्ष सध्या हेल्मेट आणि मास्क न लावणाऱ्याकडेच असून ते गावाच्या सीमेबाहेर तैनात ड्यूटी करुन दंड वसूल करण्यात व्यस्त असल्याचे चित्र आहे.