शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

बीएच्या परीक्षेपासून दोनदा विद्यार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2016 02:01 IST

गोरेगाव तालुक्यातील सोनी येथील मणिभाई ईश्वरभाई पटेल महाविद्यालयातून बीए-२ च्या परीक्षेसाठी छोटा गोंदिया परिसरातील रहिवासी ...

ऐकणारासुद्धा कुणी नाही : प्राध्यापकाने दिला विद्यार्थ्यालाच दोषगोंदिया : गोरेगाव तालुक्यातील सोनी येथील मणिभाई ईश्वरभाई पटेल महाविद्यालयातून बीए-२ च्या परीक्षेसाठी छोटा गोंदिया परिसरातील रहिवासी कशिश जियालाल चंद्रिकापुरे याने आवेदन केले होते. मात्र त्याची हॉल तिकीट आली नाही. त्यामुळे तो परीक्षा देण्यापासून वंचित राहिला. या प्रकरणात ज्या प्राध्यापकावर आरोप लावला जात आहे, ते सदर विद्यार्थ्यालाच यात दोषी असल्याचे सांगतात. कशिश चंद्रिकापुरे याने बारावीची परीक्षा खमारीच्या शाळेतून उतीर्ण केली व सोनी येथील सदर महाविद्यालयात बीए-१ मध्ये प्रवेश घेतला. याच महाविद्यालयातून त्याने बीए-१ ची परीक्षा दिली. परीक्षेत त्याचे काही विषय बाकी राहिले. या विषयांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी त्याने आॅगस्ट २०१५ मध्ये परीक्षेचे आवेदन केले. त्याने आवेदनासह आवश्यक फीससुद्धा जमा केली. आॅक्टोबर २०१५ मध्ये जेव्हा तो परीक्षेसाठी हॉल तिकीट घेण्यास गेला तर परीक्षा फार्म भरण्याचे कार्य करणाऱ्या कर्मचारी बी.ए. जांगडे यांनी सांगितले की, त्याची हॉल तिकीट आली नाही. त्यांनी कशिशला सांगितले की, फार्म भरण्याची निविदा एका कंपनीला देण्यात आली व त्या कंपनीने फार्म भरण्यात चूक केली. एवढेच नव्हे तर कशिशला सांगण्यात आले की त्याला आता आवेदन करण्याची गरज नाही. त्याची फीससुद्धा जमा आहे. त्याला आता हॉल तिकीट घेण्यास व परीक्षा देण्यास यायचे आहे. आता तो परीक्षेची हॉल तिकीट घेण्यास गेला तर त्याच प्राध्यापकाने सांगितले की, त्याने आवेदनच केले नाही. याबाबत त्याला समझाविण्यासाठी प्रा. जांगडे यांनी त्याला आपल्या घरी बोलाविले. विद्यार्थी कशिश २ एप्रिल रोजी जांगडे यांच्या घरी गोरेगाव येथे गेला होता. परंतु त्यांच्याशी चर्चा होवू शकली नाही. प्रश्न त्या विद्यार्थ्याचा एक वर्षे व्यर्थ जाण्याशी निगडीत आहे. कशिशच्या म्हणण्यानुसार, तो एकटाच नाही तर असे अनेक विद्यार्थी आहेत जे परीक्षा देण्यापासून वंचित राहिले आहे. त्या विद्यार्थ्यांना समझाविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत चौकशी केल्यावर जांगडे यांनी सांगितले की, त्या विद्यार्थ्याने टीसी दिली नव्हती. परंतु जेव्हा त्यांना आठवण करून देण्यात आली की त्याने याच महाविद्यालयातून आधी परीक्षा दिली आहे, तेव्हा जांगडे यांनी फोन बंद केला व दुसऱ्यांदा फोन केल्यावरही उचलला नाही. दरम्यान याच महाविद्यालयाच्या एका दुसऱ्या कर्मचारी शहारे यांच्याशी संपर्क केल्यावर त्यांनी म्हटले की, त्या विद्यार्थ्यांसह चांगले झाले नाही. परंतु यापेक्षा अधिक माहिती त्यांच्याकडे नसल्याचे सांगत त्यांनी अधिक काही बोलण्यास नकार दिला. विशेष म्हणजे या विद्यार्थ्याचे बीए-२ मध्ये प्रवेश झाले आहे. परंतु दोन परीक्षा तो सदर कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे देवू शकला नाही. त्यामुळे त्याचे वर्ष वाया गेले. (प्रतिनिधी)