शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दोन भावंडांच्या अपहरणाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 00:02 IST

दोन सख्ख्या भावांना पैशाचे आमिष देऊन त्यांचा तीन अज्ञात व्यक्तींनी अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना देवरीपासून काही अंतरावर असलेल्या धोबीसराड येथे १४ नोव्हेबरला घडली;.....

ठळक मुद्देधोबीसराड येथील घटना : मुले पळविणारी टोळी सक्रिय

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : दोन सख्ख्या भावांना पैशाचे आमिष देऊन त्यांचा तीन अज्ञात व्यक्तींनी अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना देवरीपासून काही अंतरावर असलेल्या धोबीसराड येथे १४ नोव्हेबरला घडली; मात्र याची माहिती देवरी पोलिसांना बुधवारी (दि.१६) देण्यात आली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आली. या घटनेमुळे देवरी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.अंकुश बबन बागडे (१३) आणि चंद्रशेखर बबन बागडे (९) रा. धोबीसराड असे अपहरण करण्याचा प्रयत्न झालेल्या दोन्ही सख्ख्या भावांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी (दि.१४) दुपारी २ वाजताच्या सुमारास हे दोघेही भाऊ घरच्या शेळ्या चारायला गावालगत असलेल्या राष्टÑीय महामार्ग क्र.६ च्या बाजूला गेले होते.दरम्यान रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन व्यक्तींपैकी एका व्यक्तिने दोन्ही भावांच्या जवळ येत त्यांना १०-१० रुपये खाऊ खाण्यास दिले. तसेच पुन्हा प्रत्येकी शंभर रुपये देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर त्यांना तुमच्या गावात किती लहान मुले आहेत. येथे घनदाट झुडूप कुठे आहे, अशी विचारपूस त्यांना केली. तसेच त्यांच्या खांद्यावर हात ठेवत तुझ्या दोन्ही किडनी बरोबर आहेत की नाही, अशी विचारणा केली. त्यामुळे अंकुशला मुलांना चोरुन नेणारे तर हे व्यक्ती नाही ना, अशी शंका आली.त्यांनी आम्ही इकडे शेळी चारायला आलो आहोत. जर शेळ्या इकडे-तिकडे गेल्या तर आमचे वडील रागावतील. त्यामुळे आम्ही घरी शेळ्या सोडून येतो, असे त्या अज्ञात व्यक्तींना सांगून दोन्ही भाऊ घरी परत आले. त्यानंतर दोन्ही भावांनी घडलेला हा सर्व प्रकार वडिलांना सांगितला. वडील बबन बागडे यांनी त्यांच्या शेजारी राहणारे राजू पटले व सदन खोटे यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर राजू पटले यांनी घटना स्थळाकडे धाव घेतली. तिथे जावून त्यांनी आरडाओरड केली. तेव्हा तिथे लपून बसलेल्या दोन व्यक्तिंनी पळ काढला. तर त्यांच्यापैकी एकजणाने शौचास बसल्याचा देखावा केला. त्याच्याजवळ जाऊन राजू पटले यांनी तू येथे काय करीत आहेस, अशी विचारणा केली.तेव्हा त्या व्यक्तीने पटले यांना खाली पाडून खिशातील चाकू काढून मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पटले चांगलेच घाबरले. त्यांनी घाबरेल्या अवस्थेतच सदर व्यक्तीच्या तोंडावर बुक्की मारुन तिथून पळ काढला. त्यानंतर गावात पोहचून घडलेला सर्व प्रकार गावकºयांना सांगितला.गावकºयांनी लगेच घटनास्थळाकडे धाव घातली. तेव्हा तिथे कुणीच आढळला नाही. यानंतर या घटनेची माहिती पोलीस पाटील व देवरी पोलिसांना दिली. पोलिसांनी या घटनेबाबद चौकशी चौकशी सुरू केल्याची माहिती आहे. दरम्यान या घटनेमुळे देवरी तालुक्यात मुलांना पळवून नेणारी टोळी तरी सक्रिय नाही ना? अशी शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.दोन भावडांच्या अपहरणाप्रकरणाची तोंडी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. त्या आधारावर आम्ही तपास केला असून अद्यापही काही सुगावा लागलेला नाही.- राजेश तटकरे,पोलीस निरीक्षक देवरी.

टॅग्स :Kidnappingअपहरण