शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

दोघींच्या विनयभंगाबद्दल दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

By admin | Updated: June 11, 2017 01:06 IST

कटंगीकला येथील दोन कुटूंबात झालेल्या वादात दोन महिलांचा विनयभंग करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : कटंगीकला येथील दोन कुटूंबात झालेल्या वादात दोन महिलांचा विनयभंग करण्यात आला. विनयभंग वरून झालेल्या वादात दोन गटातील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ श्रेणी लिपीक प्रदीपकुमार उंदल भिमटे (५३) याने कटंगीटोला येथील २६ वर्षाच्या महिलेला घरी एकटी पाहून तिचा विनयभंग केला. मी पोलीस अधिक्षक कार्यालयात आहे. माझे कुणीही काही बिघडवू शकत नाही असे त्याने म्हटले. माझ्या मधात येणाऱ्यांना अ‍ॅट्रासिटी कायद्यात अडकविण्याची धमकी दिली. त्या महिलेचा विनयभंग करून गळा आवळून ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात प्रदीप भिमटे व शालू कमलेश कावळे (२८) या दोघांवर भादंविच्या कलम ३५४ अ, ४५२, ५०४, ५०६ (ब) ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तर दुसऱ्या गटातील पोलीस हवालदार अर्जुन कावळे याने २८ वर्षाच्या महिलेला लैगिक संबंधाची मागणी करून तिचा विनयभंग केला. तसेच राजेश कावळे व नरेश कावळे या दोघांनी त्याच्या घराच्या काचा दगडानी फोडल्या. अश्लील शिवीगाळ करून ठार करण्याची धमकी दिली. या प्रकरणात अर्जुन कावळे, राजेश कावळे, नरेश कावळे या तिघांवर भादंविच्या कलम ३५४ अ, ४५२,३४१,२९४, ५०६ (ब), ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. दोन्ही गटातील आरोपींना अटक झाली नव्हती.