शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

एकाच खाटेवर दोन-दोन गर्भवती

By admin | Updated: September 1, 2015 01:49 IST

गेल्या ७५ वर्षांपासून अविरत सेवा देणाऱ्या बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात सध्या शासनाच्या अवकृपेने महिला रूग्णांचे

गोंदिया : गेल्या ७५ वर्षांपासून अविरत सेवा देणाऱ्या बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात सध्या शासनाच्या अवकृपेने महिला रूग्णांचे अक्षरश: हाल होत आहेत. परिस्थितीला हाताळताना येथील प्रशासनाच्या नाकी नऊ आले आहेत. शासन स्तरावरून रिक्त पदे भरण्यात येत नसल्यामुळे आज आरोग्य सेवेचा प्रश्न येरणीवर आला आहे. अपुऱ्या इमारतीमुळे एका खाटेवर दोन-तीन बाळंतीणींना राहावे लागत आहे.गंगाबाई रूग्णालयाची इमारत प्रस्तावित मेडिकल कॉलेजला दिली. मात्र वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले नाही. त्यामुळे रूग्णांना ठेवावे कुठे हा प्रश्न येथील अधीक्षकांना पडला आहे. सध्या रूग्णांची गर्दी असल्यामुळे चांगलेच हाल होत आहेत. विदर्भात सर्वाधिक प्रसुती करणाऱ्या रूग्णालयात क्रमांक दोनवर असलेल्या बाई गंगाबाई स्त्री रूग्णालायात गर्भवती महिलांच्या हालअपेष्टांकडे लक्ष देण्यास कोणत्याही नेत्यांना वेळ नाही. गर्भवतींना हा त्रास डॉक्टर किंवा येथील व्यवस्थापनाकडून होत नाही तर मनुष्यबळाच्या अभावामुळे आणि भौतिक सुविधांअभावी होत नाही. रूग्णांची गर्दी वाढल्याने गर्भवती महिलांना झोपण्यासाठी जागा नाही. परिणामी नाईलाजास्तव एका खाटेवर दोन किंवा तीन गर्भवती महिलांना झोपावे लागत आहे. मागील दोन वर्षापासून बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय हे २०० खाटाचे झाले, परंतु या रूग्णालयात आजही फक्त १२० खाटाच आहेत. २०० खाटांसाठी म्हणून गंगाबाई स्त्री रूग्णालयात नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आले. परंतु गोंदियात मेडीकल कॉलेज येत असल्याचे सांगून केटीएस व बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयाची इमारत मेडीकल कॉलेजसाठी मागण्यात आली. मेडीकल कॉलेज आल्यामुळे रूग्णांचा भार कमी होईल असे समजून ती इमारत त्वरीत देण्यात आली. परंतु यावर्षीही मेडीकल कॉलेजचा मार्ग मोकळा न झाल्यामुळे तयार असलेली इमारत तशीच पडून आहे. दुसरीकडे गंगाबाईत २०० खाटांची परवानगी असताना फक्त १२० खाटांवरच रूग्णांना भागवावे लागत आहे. सद्यस्थितीत बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात १९० रूग्ण दाखल आहेत. दररोज ५० ते ६० रूग्ण दाखल होत आहेत. येथे डॉक्टरांचे ५० टक्के पदे रिक्त आहेत.४८ टक्के परिचारिकांचे पद रिक्त आहेत. वर्ग चारच्या ४० टक्के जागा रिक्त आहेत. कमी मनुष्यबळात अधिक संख्येत असलेल्या रूग्णांना सेवा कशी द्यायची, हा प्रश्न येथील डॉक्टरांपुढे आहे. (तालुका प्रतिनिधी)कुत्रे व डुकरांचा उपद्रव४बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात जिकडे-तिकडे घाणच-घाण पसरलेली दिसते. एवढेच काय चक्क कुत्रे व डुकरांचा उपद्रव आवारात आहे. याच इमारतीत समोरच्या आवारात असलेल्या झाडांवर बगळ्यांचे वास्तव्य असल्याने त्यांची विष्टा येथील ओपीडीत येणाऱ्या रूग्णांना असह्य होत आहे. त्यामुळे त्या झाडांचे काय करावे, बगळ्यांचे जीवन उध्वस्त होऊ नये याचाही विचार गंगाबाई प्रशासन करीत आहे. दोन तज्ज्ञ करतात दिवसाला ३० प्रसूती४बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयातील प्रसूतीसाठी शासनाने सहा प्रसूतितज्ज्ञाची मंजुरी दिली. मात्र सद्यस्थितीत येथे दोनच स्त्रीरोग तज्ज्ञ काम करीत आहेत. डॉ.सयास केंद्रे व डॉ. योगेश सोनारे सध्या १८ तास काम करतात. दररोज २५ ते ३० च्या संख्येत प्रसुती होते. त्यात आठ ते १० महिलांच्या शस्त्रक्रिया होतात. मात्र येथे डॉक्टरांची व्यवस्था करण्यासाठी शासन लक्ष देत नाही. राजीव गांधी जीवनदायी योजनेकडे दुर्लक्ष४बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात डॉक्टरांची कमतरता आहे. मात्र गर्भवती रूग्णांची संख्या वाढली असल्याने गर्भवतींची सुरक्षा करण्यात येथील तोकड्या यंत्रणेला राजीव गांधी जीवनदायी योजनेकडे दुर्लक्ष करावे लागते. मागील अनेक दिवसांपासून राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत शस्त्रक्रिया होत नाहीत. त्यामुळे या योजनेचा फायदा काय? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.