शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

शिकारीसाठी सोडलेल्या करंटमुळे दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2022 20:51 IST

लोखंडी गेट चोरून नेत असताना परसटोला पहाडीजवळ अज्ञात व्यक्तीद्वारे शिकारीसाठी लावण्यात आलेल्या तारेला स्पर्श झाल्याने अनमोल गायकवाड़ व आशीष कोसरे हे दोघे खाली पडले. त्यांच्या मागे असणाऱ्या तिघा मित्रांनी त्यांना खेचून तारांच्या बाजूला केले व गावात येऊन घटनेची माहिती दिली. गावकऱ्यांच्या मदतीने त्या दोघांना ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : बंद पडलेल्या जिल्हा परिषद शाळेचे गेट रात्रीच्या अंधारात चोरून नेत असताना जंगलात  शिकारीसाठी लावलेले करंट लागून  दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या सोबत असलेले तिघे थोडक्यात बचावले. शनिवारी (दि. ५) रात्री ११.३० वाजण्याच्या  सुमारास  शहराजवळील परसटोला पहाडीजवळ ही घटना घडली. अनमोल नंदलाल गायकवाड़ (वय २२) व आशीष मुन्ना कोसरे (२८, रा. परसटोला, प्रभाग क्रमांक १६) अशी मृत तरुणांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मृत अनमोल गायकवाड़, आशीष कोसरे व त्यांचे तीन मित्र मनोहर कुंजाम, बबलू माहुरकर आणि श्याम भारती यांनी एमआयडीसी परिसरात बंद अवस्थेत असलेल्या जिल्हा परिषद शाळेचे लोखंडी गेट आरीने कापले. लोखंडी गेट चोरून नेत असताना परसटोला पहाडीजवळ अज्ञात व्यक्तीद्वारे शिकारीसाठी लावण्यात आलेल्या तारेला स्पर्श झाल्याने अनमोल गायकवाड़ व आशीष कोसरे हे दोघे खाली पडले. त्यांच्या मागे असणाऱ्या तिघा मित्रांनी त्यांना खेचून तारांच्या बाजूला केले व गावात येऊन घटनेची माहिती दिली. गावकऱ्यांच्या मदतीने त्या दोघांना ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. फिर्यादी मनोहर रूपसिंग कुंजाम यांच्या तोंडी रिपार्टवरून देवरी पोलिसांनी अनमोल व आशिष यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार रेवचंद सिंगनजुड़े यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद घाडगे तपास करीत आहेत. 

चार  वर्षांपासून शाळा बंद, दारे व खिडक्या चोरीला- शहराला लागून असलेल्या मोठा परसटोलाजवळील जिल्हा परिषद शाळेचे गेट चोरून नेत असताना करंट लागून  अनमोल व आशिषला जीव गमवावा लागला. ही शाळा पटसंख्येच्या अभावामुळे मागील चार वर्षांपासून बंद आहे. शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे शाळेची इमारत बेवारस अवस्थेत असल्याने चोरांनी या शाळेच्या खिडक्या व दरवाजे केव्हाचेच लंपास केले आहेत. शिल्लक असलेले गेट शनिवारी रात्री चोरून नेत असताना ही दुर्घटना झाली. या दुर्घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. 

रोजगार नसल्याने वाढले चोरीचे प्रमाण- परसटोलामध्ये एमआयडीसी स्थापन होऊन बरीच वर्षे झाली. मात्र फक्त एक कारखाना स्थापन झाला असून, त्यामध्येसुद्धा या गावातील एकाही बेरोजगार युवकास रोजगार न मिळाल्याने बरेच युवक गैरमार्गाने पैसा मिळविण्याच्या प्रयत्नात आपला जीव गमावत आहेत. एमआयडीसीमध्ये युवकांना रोजगार केव्हा मिळणार? हा संतप्त सवाल युवक उपस्थित करीत आहेत.

आरोपीला शोधण्यास पोलिसांना करावे लागणार शर्तीचे प्रयत्नएमआयडीसी परिसराजवळ जंगली जनावरांची शिकार करण्याच्या हेतूने अज्ञात आरोपीने इलेक्ट्रिक करंटच्या तारा खाली सोडल्या होत्या. त्या तारांना स्पर्श झाल्याने अनमोल व आशिष यांना आपला जीव गमवावा लागला. याप्रकरणी त्या अज्ञात आरोपीविरुद्ध पोलिसांनी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून, शोध घेतला जात आहे. मात्र, आता हा प्रकार करणाऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांना चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग