शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मांडोदेवीच्या जंगलात आढळले दोन मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 00:48 IST

तालुक्यातील बघेडा येथील सूर्यादेवी मांडोदेवी परिसरातील हरदोली मार्गावर देवस्थानापासून अर्ध्या कि.मी. अंतरावर एका विवाहित महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह शुक्रवारी (दि.१४) सायंकाळच्या सुमारास आढळला.

ठळक मुद्देविवाहितेचा गळा चिरून खून : गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला तरुण

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : तालुक्यातील बघेडा येथील सूर्यादेवी मांडोदेवी परिसरातील हरदोली मार्गावर देवस्थानापासून अर्ध्या कि.मी. अंतरावर एका विवाहित महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह शुक्रवारी (दि.१४) सायंकाळच्या सुमारास आढळला. या प्रकरणाचा तपास करण्याकरिता आज (दि.१५) आमगाव पोलीस जंगलात गेले असता मांडोदेवी ते तेढा या मार्गावर मांडोदेवी देवस्थानापासून अर्ध्या कि.मी.अंतरावर झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.या दोन्ही घटनांमध्ये काही संबंध आहेत काय? याचा पोलीस शोध घेत आहेत. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या मांडोदेवी ते हरदोली मार्गावर रस्त्याच्या कडेला सालेकसा तालुक्यातील सालईटोला (बापूटोला) येथील काजल इंद्रराज राऊत (२२) या विवाहितेचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत रक्ताने माखलेला आढळला. याची माहिती आमगाव व सालेकसा पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. परंतु ज्या ठिकाणी महिलेचा मृतदेह आढळला ते स्थळ आमगाव पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने आमगाव पोलिसांनी प्रकरण आपल्या हाती घेतले. सायंकाळ झाल्याने पोलीस परतले.शनिवारीे (दि.१५) सकाळी पोलीस मांडोदेवीच्या जंगलात गेले असता आमगाव पोलिसांच्या हद्दीतच तेढा मार्गावर रस्त्याच्या कडेला जंगलात झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळला. तो तरुण सडक अर्जुनी तालुक्यातील जांभळी या गावातील आहे. त्या तरुणाचे नाव विलास शामराव कोचे (२५) रा.जांभळी (दोडके) असे आहे. या दोन्ही घटना एक कि.मी.अंतरावर असल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. विलास हैदराबाद येथे कामाला होता. तो आता गावाकडे आला होता. या दोन्ही घटनांमध्ये काही संबंध आहेत काय, याचा तपास पोलीस करीत आहेत. तरुणाची हत्या की आत्महत्या या दृष्टीने देखील आमगाव पोलीस तपास करीत आहेत.तरुणी होती विवाहितशुक्रवारी जंगलात रक्ताने माखलेल्या आणि मृतावस्थेत आढळून आलेल्या तरुणीचे लग्न गोरेगाव येथील युवकाशी मागीलवर्षी उन्हाळ्यात झाले होते. परंतु तीचे सासरच्याशी पटत नसल्याने आपल्या माहेरी राहात होती. ती साखरीटोला येथे संगणकाचे प्रशिक्षण घेत होती.

टॅग्स :Murderखून