गोंदिया : मारूती ओमनीच्या (एमएच ३४/आर-७४२७) ६० वर्षीय चालकाने ताब्यातील वाहन हलगर्जीपणे चालवून तिरोडाकडून गोंदियाकडे येणाऱ्या दुचाकीला (एमएच ३५/झेड-१७०४) धडक दिली. यात दुचाकीवर मागे बसलेले गोविंदा कुंदरू भलावी (५२) रा. हेटीटोला (दांडेगाव) गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावले. दुचाकी चालक अमित तुळशीराम भलावी (२३) रा. हेटीटोला (दांडेगाव) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (दि.७) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास डोंगरगाव राज्यमार्ग-२४९ येथे घडला. सहायक फौजदार तुंबळे यांच्या तक्रारीवरून गंगाझरी पोलिसांनी भादंविच्या कलम २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) व मोटार वाहन कायद्याच्या सहकलम १७४, १३४ (अ) (ब) अन्वये गुन्हा दाखल केला. तपास पो. निरीक्षक कदम करीत आहे.(प्रतिनिधी)
कारच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार
By admin | Updated: June 11, 2015 00:45 IST