शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मुर्रीच्या बार मालकाला लुटणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:33 IST

गोंदिया : मुर्री रेल्वे चौकी येथील येरणे बार येथे २६ फेब्रुवारीच्या रात्री ९ वाजता तिघांनी बार मालकाला मारहाण करून ...

गोंदिया : मुर्री रेल्वे चौकी येथील येरणे बार येथे २६ फेब्रुवारीच्या रात्री ९ वाजता तिघांनी बार मालकाला मारहाण करून त्याच्या काउंटरमधील १९ हजार रुपये रोख व दारूच्या चार बाटल्या हिसकावून नेल्या होत्या. या प्रकरणात तिघांवर गोंदिया शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील आशुतोष डोंगरे (२३) व पंकज पन्नालाल खोब्रागडे (१८, दोन्ही रा. गौतमनगर, गोंदिया) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

कुणाल हेमंत येरणे हा मुर्री येथील येरणे बारमध्ये काउंटरवर असताना आरोपी संदीप लक्ष्मीकांत चौधरी (२४), आशुतोष डोंगरे (२३) व पंकज पन्नालाल खोब्रागडे (१८, तिन्ही रा. गौतमनगर, गोंदिया) या तिघांनी कुणालला दारू पाज, असे म्हटल्यावर त्यांना दारू पाजण्यास कुणालने नकार दिला होता. त्यावर पंकज खोब्रागडे याने त्यांच्या काउंटरमधील गल्यातून १९ हजार काढले. दोन बॉटल मॅकडॉल नंबर १ व व्हिस्कीच्या दोन बॉटल अशा ४०० रुपये किमतीच्या चार बॉटल हिसकावून घेतल्या. त्यांना कुणालने थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्याला धक्काबुक्की केली. तिघांवर गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ३९४, ३२३, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. यापैकी आशुतोष व पंकज या दोघांना साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष सपाटे यांनी अटक केली आहे. आरोपी संदीप लक्ष्मीकांत चौधरी (२४, रा. गौतमनगर, गोंदिया) हा फरार आहे.