शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भिंत फोडून मोबाईल गॅलरीतून पाच लाखाचे मोबाईल चोरणाऱ्या झारखंडच्या दोघांना अटक

By नरेश रहिले | Updated: January 15, 2024 15:20 IST

आमगाव पोलिसांची कारवाई: २८ पैकी दोन मोबाईल केले हस्तगत

गोंदिया: आमगावच्या पाणी टाकी जवळील शिवणकर चाळ मध्ये असलेल्या पवार मोबाईल गॅलरीच्या मागणी भिंत फोडून अज्ञात चोरट्यांनी ५ लाख ६० हजार रूपये किंमतीचे २८ मोबाईल २ ऑक्टोबर रोजी सकाळी पळविले होते. या प्रकरणातील दोन आरोपींना झारखंडच्या राधानगर पोलीस ठाणे हददीतील पियारपुर गावातून अटक करण्यात आली. लुटू शेख (३०) व असरुद्दीन शेख (४०) झारखंड अशी आरोपींची नावे आहेत.

आमगाव तालुक्याच्या बंजारीटोला येथील दुर्गेश डिगलाल गौतम यांच्या पवार मोबाईल गॅलरीची भिंत फोडून अज्ञात चोरट्यांनी ही चोरी केली. आमगावच्या गांधी चौक ते कामठा चौक दरम्यान असलेल्या जून्या पाणी टाकीच्या जवळ शिवणकर चाळ आहे. या चाळमध्ये भाड्याने घेतलेल्या खोलीत पवार मोबाईल गॅलरी उघडण्यात आली. १ ऑक्टोबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी या मोबाईल गॅलरीच्या मागील भागाची भिंत तोडून त्या मोबाईल गॅलरीतून अत्यंत महागडले असलेले २८ मोबाईल पळविले. त्या मोबाईलची किंमत ५ लाख ६० हजार सांगितली जाते. या मोबाईल गॅलरीचे मालक दुर्गेश डिगलाल गौतम रा. बंजारीटोला हे २ ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे सकाळी १० वाजता आपली दुकान उघडण्यासाठी आले असतांना त्यांच्या दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले होते. आपल्या दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी मोबाईलवर आमगाव पोलिस ठाण्यात संपर्क केला. आमगाव पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील आरोपींना झारखंड येथून अटक केली आहे.आरोपी होते बांगलादेशात पळण्याच्या तयारीतआरोपी लुटू शेख (३०) व असरुद्दीन शेख (४०) हे बांगलादेशामध्ये पळून जाण्याचा तयारीत असतांना आमगाव पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्या दोघांना पकडून त्यांच्या जवळील दोन मोबाईल हस्तगत केले आहे.