शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

म्होरक्यासह दोन आरोपी गजाआड

By admin | Updated: August 19, 2015 02:06 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत उके यांच्यावर प्राणघातक हल्ला करून आरोपी पसार झाले. यातील दोन हल्लेखोरांना शनिवारला अटक करण्यात आली होती.

प्रकरण हल्ल्याचे : नागपुरात केली अटक, चार आरोपी फरारतुमसर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत उके यांच्यावर प्राणघातक हल्ला करून आरोपी पसार झाले. यातील दोन हल्लेखोरांना शनिवारला अटक करण्यात आली होती. यातील आणखी दोघांना रविवारी रात्री नागपुरातून अटक करण्यात आली आहे.१५ आॅगस्टला निलेश शेंडे रा. काचेपुरा सीताबर्डी व अमोल महेंद्र मेश्राम रा. रमाईनगर कामठी याला अटक केली होती. रविवारी रात्री या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार संतोष डहाट (२५) रा. आंबेडकर वॉर्ड, तुमसर व त्याचा मित्र अमन नागदेवे (२२ रा. वैशालीनगर, नागपूूर याला नागपुरातून अटक करण्यात आली. चौघांनाही न्यायालयाने २१ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या हल्ला प्रकरणातील पुन्हा चार आरोपी अद्याप फरार आहे. आरोपींनी हल्ल्यात वापरलेले चारचाकी वाहन तुमसर पोलिसांनी जप्त केले आहे.१२ आॅगस्टला नगरसेवक उके शासकीय आयटीआयसमोरील घर बांधकामावर जाताना चारचाकीतून आलेल्या आठ हल्लेखोरांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात ते जखमी झाले. त्यांच्यावर यांच्यावर देशी कट्ट्यातून दोन फैरी झाडल्या होत्या. त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, असे समजून हल्लेखोर घटनास्थळावरुन पसार झाले होते.पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवित यातील आरोपींना अटक केली. या हल्ल्यात सुपारी किलरची मदत घेण्यात आली. संतोष डहाट व अमन नागदेवे रविवारी रात्री वैशाली नगरात पान दुकानाजवळ उभे होते. डी.बी. पथकाने सापळा रचून दोघांना अटक केले. या हल्ल्यातील आणखी चार आरोपी फरार आहेत. नगरसेवक यांच्यावर आठ हल्लेखोरांनी हल्ला केला असा अंदाज आहे. चार आरोपीपैकी तीन आरोपी हे नागपूर व कामठीचे आहेत. आपसी वैमनस्यातून हा हल्ला करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. (तालुका / शहर प्रतिनिधी)