शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय योजनांचा दुहेरी लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 20:49 IST

शासनाच्या योजनेतून गाव विकास कामांना प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत मानेगावने कार्यगती अभियान राबविले आहे. या अभियानातंर्गत नियोजित कामांना गती देण्यासाठी पदाधिकारी व सदस्यांनी यात प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. तर शासनाच्या योजनेमुळे गावाला दुहेरी लाभ मिळत असल्याचे सरपंच सुनंदा उके यांनी सांगितले.

ठळक मुद्देमानेगावात कार्यगती अभियान : नरेगाने दिले जलसिंचन व हाताला रोजगार

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : शासनाच्या योजनेतून गाव विकास कामांना प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत मानेगावने कार्यगती अभियान राबविले आहे. या अभियानातंर्गत नियोजित कामांना गती देण्यासाठी पदाधिकारी व सदस्यांनी यात प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. तर शासनाच्या योजनेमुळे गावाला दुहेरी लाभ मिळत असल्याचे सरपंच सुनंदा उके यांनी सांगितले.सदर अभियानांतर्गत ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य यांनी नरेगा अंतर्गत कार्यारंभ असलेल्या कामांवर भोजन अवकाश वेळेत कार्यगती अभियानास सुरुवात केली. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून सरपंच सुनंदा उके, उपसरपंच अरुण मानकर, सचिन एस.एस. ब्रह्मवंशी, ग्रामपंचायत सदस्य राजेश भलावी, शिशुकला रहांगडाले, प्रकाश मेश्राम, मालन मेश्राम, केशर गुजर, लता कांबळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष आंबेडारे, पोलीस पाटील संजय पुंडे उपस्थित होते.कार्यगती अभियानांतर्गत आयोजित उपक्रमात सरपंच सुनंदा उके यांनी, शासनाच्या योजनेतून गावाला दुहेरी लाभ मिळत आहे.नरेगा अंतर्गत विकासकामात जलसिंचनासाठी तलाव खोलीकरणाला गती मिळाली आहे. तर या जलसिंचनासाठी सुरु असलेल्या कार्यातून गावातील नागरिकांना रोजगार उपलब्ध होत आहेत. असे मत व्यक्त करीत शासनाच्या योजना कार्यान्वित करण्यासाठी नागरिकांनी प्रत्यक्ष सहभाग घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.या वेळी ग्रामसचिव एस.एस. ब्रह्मवंशी यांनी नरेगा अंतर्गत प्रस्ताव, नियोजनाची माहिती, रोजगार संधी व लाभ याबाबद शासन परिपत्रकाची माहिती दिली. तसेच नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.मानेगाव ग्रामपंचायत अंतर्गत कार्यगती अभियानात नरेगा कार्यारंभ कामाची पाहणी खंडविकास अधिकारी एस.एम. पांडे, विस्तार अधिकारी एल.एन. कुटे, के.एम. रहांगडाले यांनी केली. तसेच शासकीय योजना व लाभ याबाबद माहिती देत नागरिकांच्या कार्याची दखल घेतली व जल सिंचनाचे महत्व समजावून सांगण्यात आले.संचालन व आभार उपसरपंच अरुण मानकर यांनी केले. अभियानाच्या यशस्वितेसाठी ग्रामपंचायतचे पदाधिकारी व गावकरी यांनी सहकार्य केले.