शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल नऊ वेळा सायकलने केली पंढरपूरवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:25 IST

सायकलने तब्बल नऊ वेळा पंढरपूरची वारी करुन गोंदिया जिल्ह्यातील ६३ वर्षीय व्यक्तीने विठ्ठलभक्त आणि तरुणपिढीसमोर आदर्श ठेवला आहे.

ठळक मुद्दे६३ वर्षीय विठ्ठलभक्त डॉ. वाढई यांचे सर्वत्र कौतुक

विजय मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : सायकलने तब्बल नऊ वेळा पंढरपूरची वारी करुन गोंदिया जिल्ह्यातील ६३ वर्षीय व्यक्तीने विठ्ठलभक्त आणि तरुणपिढीसमोर आदर्श ठेवला आहे. त्यामुळे या विठ्ठल भक्ताचे जिल्ह्यात सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.डॉ. प्रदीप अनंतराम वाढई, रा.गुदमा, जिल्हा गोंदिया असे सायकलने नऊवेळा पंढरपूरची वारी पूर्ण करणाºया डॉक्टरचे नाव आहे. ते सालेकसा येथे आयुर्वेदीक दवाखाना चालवितात. एक सल्लागार चिकित्सकाची भूमिका सुध्दा ते बजावित आहेत. ते आपल्या उपचार पध्दतीने अनेकांचे रोग दूर करण्यात यशस्वी राहिले. अनेक वर्षापासून सालेकसात दवाखाना चालवित आयुर्वेदीेक औषधोपचार करतात.त्यामुळे तालुक्यात ते सर्वत्र परिचित आहेत. डॉ. प्रदीप वाढई विठ्ठलभक्त असून दरवर्षी सायकलने पंढरपूरवारी करुन विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतात. त्यांचे वय ६३ वर्षाचे झाले तरी त्यांच्यातील उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. यंदा त्यांच्या पंढरपूर वारीचे हे नववे वर्ष होते.सालेकसा येथून ते १९ आॅक्टोबर रोजी त्यांनी पंढरपूर जाण्यासाठी सायकलने यात्रा सुरु केली. गावातील लोकांनी त्यांना शुभेच्छा देत दिल्यानंतर ते पुढीेल प्रवासाला निघाले.२५ दिवसाची पंढरपूर यात्रा पूर्ण करीत ते सोमवारी (दि.१४) रोजी परत आल्यानंतर सालेकसावासीयांनी त्यांचे पुष्पहार घालून जोरदार स्वागत केले. यावेळी सालेकसाचे प्रमुख सराफा व्यापारी व वरिष्ठ नागरिक यांनी शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले. यावेळी डॉ. श्यामसुंदर राठी, राजेश जैन, कोमल जैन, अवस्थी महाराज, राजू अग्रवाल, मुलचंद टेंभरे, दर्शन जैन, प्रभुदयाल असाटी, आशीष शेंडे, पोगळे, चौव्हाण, गौतम यांनी उपस्थित होते.