शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जड वाहतूक बंद करा

By admin | Updated: May 7, 2016 01:48 IST

जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहेषराम कोरोटे यांच्या देवरी येथील निवासस्थानी तालुका काँग्रेस कमिटीची सभा घेण्यात आली.

विविध मागण्या : जिल्हा काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांना निवेदनदेवरी : जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहेषराम कोरोटे यांच्या देवरी येथील निवासस्थानी तालुका काँग्रेस कमिटीची सभा घेण्यात आली. या सभेत छत्तीसगड राज्यातील छुरीया, ककोडी, चिचगड, देवरीमार्गे ओव्हरलोड वाहतूक बंद करण्यात यावे. गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांना मारहाण करणाऱ्या आरोपीस त्वरित अटक करण्यासंदर्भात येत्या ७ मे रोजी गोंदिया येथे काढण्यात येणाऱ्या धडक मोर्चा संबंधात आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्या संबंधात चर्चा करुन नंतर सर्व संमतीने देवरीचे उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना एक निवेदन जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहेषराम कोरोटे यांच्या नेतृत्वात तालुका काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने सादर केले. या निवेदनात छत्तीसगड राज्यातील छुरीया, ककोडी, चिचगड ते देवरी मार्गे चालणाऱ्या सर्व ओव्हरलोड वाहतूक त्वरित बंद करण्यात यावे. कारण हा मार्ग एकपदरी रस्ता आहे. या मार्गावरुन आरटीओचा कर वाचविण्याकरिता दररोज छत्तीसगड राज्यातील छुरीयावरुन २०० ते ५०० जड वाहतूक होते. त्यामुळे या मार्गाची अत्यंत दूरवस्था झाली आहे. तरी ही जड वाहतूक त्वरित बंद करावे. तसेच केंद्र व राज्य शासनानुसार देवरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय दयनिय झाली आहे. या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे, विद्युत बिल माफ करावे तर मनरेगा मार्फत सर्व शेतकऱ्यांचे रोवणी, मळणी व इतर कामे करण्यात यावे. शेतकऱ्यांना दुष्काळ निधी हेक्टरी २५ हजार रुपये देण्यात यावे आणि त्यांना नि:शुल्क बियाणे देण्याची व्यवस्था करण्यात यावी, असे म्हटले आहे. सदर मागणी त्वरित पूर्ण न झाल्यास या मागणीला धरुन पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून दिला आहे.शिष्टमंडळात जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहेषराम कोरोटे, माजी आ. रामरतन राऊत, महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरतसिंग दुधनाग, देवरी नगर पंचायतचे उपाध्यक्ष ओमप्रकाश रामटेके, जि.प. सदस्य माधुरी कुंभरे, पं.स. उपसभापती संगीता भेलावे, पं.स. सदस्य लकनी सलामे आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)