शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या उड्डाणपुलावरुन जड वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:58 IST

शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो वाहतुकीसाठी सुरू ठेवणे धोकादायक असल्याचे पत्र रेल्वे विभागाने दिले. यानंतर जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली. ‘लोकमत’ने सर्वप्रथम हा मुद्दा उघडकीस आणला.

ठळक मुद्देसां.बा.विभाग लागला कामाला : जिल्हाधिकाऱ्यांनी बोलविली बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो वाहतुकीसाठी सुरू ठेवणे धोकादायक असल्याचे पत्र रेल्वे विभागाने दिले. यानंतर जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली. ‘लोकमत’ने सर्वप्रथम हा मुद्दा उघडकीस आणला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने सोमवारी (दि.३०) अधिसूचना काढून मंगळवारपासून (दि.३१) उड्डाणपूल जड वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावरील उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो केव्हाही कोसळू शकतो. मुंबई येथे रेल्वेचा जुना पूल कोसळल्यानंतर रेल्वे विभाग कुठलाही धोका पत्करण्यास तयार नाही. त्यामुळे रेल्वे विभागाने तडाकफडकी जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देवून जुना उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश दिले. हे पत्र जिल्हाधिकाºयांच्या हातात पडताच त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक नियंत्रण विभागाच्या अधिकाºयांची बैठक घेवून यावर उपाय योजना काढण्यासाठी मार्गदर्शन मागविले.त्यात शहरात येणारी सर्व जड वाहतूक बायपास मार्गे वळविण्याचा निर्णय घेतला.आमदार गोपालदास अग्रवाल यांनी जुन्या उड्डाणपुलावरुन वाहतूक पूर्णपणे बंद केल्यास शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण होईल. तसेच शहरवासीयांना त्रास सहन करावा लागले. त्यामुळे जुना उड्डाणपूल पायी जाण्यासाठी व हलक्या वाहनासाठी सुरू ठेवण्याची मागणी प्रशासनाकडे लावून धरली. त्यानंतर प्रशासनाने अग्रवाल यांच्या मागणीनुसार या पुलावरुन हलक्या वाहनांची वाहतूक सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने सोमवारी (दि.३०) सांयकाळी जुन्या उड्डाणपुलावरुन जड वाहतूक पूर्णपणे बंद करण्याची अधिसूचना काढली.जिल्हाधिकाऱ्यांनी बोलविली बैठकजुन्या उड्डाणपुलाच्या विषयावर जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी बुधवारी (दि.१) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलविली आहे. या बैठकीत जीर्ण झालेल्या जुन्या उड्डाणपुलाच्या विषयावर तोडगा काढण्यात येणार आहे. या पुलाच्या स्ट्रक्चर आॅडिटचा अहवाल आल्यानंतर पूल पाडायचा की नाही व वाहतूक कोणत्या मार्गे वळवायची यावर या बैठकीत तोडगा काढण्यात येणार असल्याची माहिती आहे.रेल्वे विभागाकडून वाढला दबाबगोंदिया-बालाघाट मार्गावरील जीर्ण झालेल्या जुन्या उड्डाणपुलासंदर्भात रेल्वे विभाग कुठलीही जोखीम पत्कारण्यास तयार नाही. मुंबई येथील घटनेनंतर रेल्वे प्रशासन सुद्धा कोमात आहे. अशात जुन्या उड्डाणपुलावरुन एखादी घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण राहणार असा सवाल सुद्धा उपस्थित केला जात आहे. त्यामुळे रेल्वे विभाग जुन्या उड्डाणपुलावरुन वाहतूक सुरू ठेवण्यासाठी तयार नसल्याची माहिती आहे.नवीन पुलाची करणार दुरूस्तीदोन वर्षापूर्वी गोंदिया-बालाघाट मार्गावर नवीन उड्डाणपूल तयार करण्यात आला होता. मात्र नवीन उड्डाणपुलाच्या दोन्हीे बाजुला पायी जाणाºया नागरिकांसाठी पादचारी पूल तयार करण्यात आला नाही.त्यामुळे हा पूल सदोष पूर्ण असून यात सुद्धा दुरूस्ती करण्याची गरज असल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला असल्याची माहिती आहे.