शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल शाळेतील संगणक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 22:34 IST

जिल्ह्यात शैक्षणिक वातावरण निर्मिती व्हावी यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाकडून ज्ञान रचनावाद, वाचन आनंद दिवस, प्रेरणा दिवस, वाचन कुटी, दप्तर विरहित दिन असे विविध उपक्रम घेतले जातात.

ठळक मुद्देपुढे पाठ-मागे सपाट : वीज बिल भरण्यासाठी होते गोची

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात शैक्षणिक वातावरण निर्मिती व्हावी यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाकडून ज्ञान रचनावाद, वाचन आनंद दिवस, प्रेरणा दिवस, वाचन कुटी, दप्तर विरहित दिन असे विविध उपक्रम घेतले जातात. खाजगी शाळातील विद्यार्थ्यांना लाजवेल अशा जि.प.च्या शाळा करण्याचा माणस शिक्षण विभागाचा आहे. शाळा डिजिटल झाल्याचा कांगावा होत असला परंतु मागील ७-८ वर्षापासून जि.प. शाळांना दिलेले संगणक संच धुळखात पडले आहेत.एकीकडे शाळा डिजिटल करण्यावर शिक्षण विभागाचा भर आहे. गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या संपूर्ण शाळा डिजीटल झाल्या. मात्र दुसरीकडे डिजीटल झालेल्या शाळा वीज बिल भरण्यासाठी असमर्थ ठरत असल्याने या शाळांतील संगणक संच मागील अनेक वर्षापासून धुळखात पडले आहेत. आमगाव तालुक्यात १९ शाळांमध्ये ३९ संगणक संच, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १८ शाळांमध्ये ४४ संच, देवरी तालुक्यातील १७ शाळांमध्ये ४६ संच, गोंदिया तालुक्यातील २७ शाळांमध्ये १०० संच, गोरेगाव तालुक्यातील २६ शाळांमध्ये ४७ संच, सालेकसा तालुक्यातील १७ शाळांमध्ये ४६ संच, सडक अर्जुनी तालुक्यातील २० शाळांमध्ये ३६ संच, तिरोडा तालुक्यातील २१ शाळांमध्ये ६४ संच देण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण उच्च माध्यमिक असलेल्या १६५ शाळांमध्ये ४२२ संच देण्यात आले.मात्र यातील बहुतांश शाळांतील संगणक संच बंद पडून आहेत. विद्यार्थ्यांनी या संगणक संचांचा वापर करावा यासाठी शासनाने हे संच जिल्हा परिषदेच्या शाळांना दिले होते. परंतु हे संगणक संच एकदा बिघडल्यावर त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी नाही. संगणक वापरासाठी लागणारी वीज व त्या वीज बिलाचा भरणा करण्यासाठी पैसे देत नसल्याने हे संगणक संच मागील अनेक वर्षांपासून बंद पडले आहेत.वीज बिल मुख्याध्यापकाच्या खिशातूनशाळांच्या विकासासाठी शासन सादिलवार राशी देते. परंतु ही राशी अत्यल्प प्रमाणात असल्यामुळे वर्षभरात शाळा चालविण्यासाठी लागणारा खर्च मुख्याध्यापकांना नाईलाजास्तव आपल्या खिशातून करावा लागतो. शासन देत असलेली सादिलवार राशी एका महिन्याच्या खर्चापुर्ती आहे. यंदा सादिलवार राशी मिळाली. परंतु यापुर्वी ५-७ वर्षापासून शाळांना सादिलवार राशी मिळाली नसल्याची ओरड आहे. एका शाळेला महिन्याभराचा वीज बिलाचा खर्च मोठ्या प्रमाणात येत असतो. वीज विभागही या शाळांना वीज बिल व्यावसायीक बिल म्हणून अधिकचे देते. घरुगुती वापरासाठी जे बिलाचे दर आहेत, ते दर शाळांना दिल्यास वीज बिलाचा भरना सहजरित्या होऊ शकेल. व्यावसायीक दराने वीज बिल देण्यात येत असल्यामुळे अनेक शाळांतील वीज बिल भरल्या जात नाही. परिणामी त्या शाळांतील वीज पुरवठा खंडीत केला जातो.