शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

तंमुसने लावले प्रेमी युगुलाचे शुभमंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 22:01 IST

तिरोडा तालुक्यातील बेरडीपार (काचेवानी) येथे आंतरजातीय प्रेमी युगलाचा विवाह सोहळा महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या माध्यमाने आणि दुर्गा उत्सव समिती व गावकºयांच्या सहकार्याने पार पडला.

ठळक मुद्देमोबाईलवरुन जुडले प्रेमसंबंध : दोन महिन्यांत दोन आंतरजातीय विवाह

लोकमत न्यूज नेटवर्ककाचेवानी : तिरोडा तालुक्यातील बेरडीपार (काचेवानी) येथे आंतरजातीय प्रेमी युगलाचा विवाह सोहळा महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या माध्यमाने आणि दुर्गा उत्सव समिती व गावकºयांच्या सहकार्याने पार पडला. दोन्ही प्रेमवीर वेगवेगळ्या जातीचे असून त्यांचे प्रेमप्रकरण मोबाईलवरुन घडून आले. दोन वर्षानंतर ओळख पटली.बेरडीपार (काचेवानी) येथील दुर्गा माता मंदिरात १८ सप्टेंबरला महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या पुढाकारणे विवाह सोहळा पार पडला. मुलाचे नाव राजू लालचंद उके (२४) रा. बेरडीपार असून मुलीचे नाव दिपसरा जगदीश काळसर्पे (१९) रा. भानपूर ता. खैरलांजी, जि. बालाघाट असे आहे.विवाह सोहळा सरपंच ज्योत्स्ना कमलेश टेंभेकर यांच्या अध्यक्षतेत, तंमुस अध्यक्ष धनराज पटले, पोलीस पाटील इंसराज कटरे, सुरेश झगेकार, भूवन कापसे, जयकुमार रिनाईत, पन्नालाल कटरे, प्रकाश ठाकरे, डॉ. गणेश कोल्हटकर, नारायण पटले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. लग्नाबाबत तंमुसने कागदोपत्री कारवाई पूर्ण करुन लग्न सोहळ्याची वेळ दिली. सामाजिक रितीरिवाजाप्रमाणे मुलाचे मामा दिलीप तुमसरे तर वधूचे मामा म्हणून पोलीस पाटील हंसराज कटरे यांनी विधिवत मंगल कार्याप्रसंगी सहयोग केले. मंगळाष्टके अध्यक्ष धनराज पटले यांनी पूर्ण केले.प्रेमी युगलांनी तंमुसला दिलेल्या बयानात सांगितले की, दोन वर्षापूर्वीपासून मोबाईलद्वारे एका दुसºयाचे संबंध जुडले. ते संबंध मोबाईलपर्यंतच टिकून राहिले. दोन वर्षात प्रत्यक्ष भेटी झाल्या नाहीत. राजू आणि दिपसरा यांची प्रत्यक्षात भेट तीन महिन्यांपूर्वी झाली. यातून या दोघांच्या प्रेमात खूप जवळीकता निर्माण झाली. दोघांनी जीवनसाथी बनण्याचा निर्णय घेतला. बेरडीपारचे तंमुस अध्यक्ष धनराजक पटले यांच्याशी संपर्क साधून दोघांनी इच्छा व्यक्त केली. यावर अध्यक्षांनी तातडीची सभा बोलावली.दोघांच्या इच्छेप्रमाणे मुलीच्या भावाला व भाटव्याला सूचना देवून विवाह सोहळ्यात उपस्थित राहण्यास कळविण्यात आले. मात्र त्यांनी येण्यास नकार देत आपण लग्न करुन द्या किंवा त्यांच्या मर्जीने काही करा, असे उत्तर दिले. दोन्ही बालीक असल्याने विवाह सोहळ्याची मंजुरी देवून लग्न सोहळा पार पाडण्यात आला. यासाठी तंटामुक्त समितीने पुढाकार घेतला.लग्न सोहळ्याला सेवकराम रहांगडाले, व्यंकट चौधरी, नामेश्वर कटरे, राजेंद्र वाघाडे, नन्नू पटले, मनोहर पटले, लालचंद नेवारे, कोमल पटले, अनिता उके, उमेंद्र वालदे यांनी सहकार्य केले. यावेळी शेकडो महिला पुरूष उपस्थित होते. गेल्या आॅगस्ट महिन्याच्या ४ तारखेला सुरेंद्र उके व कल्पना कुंभरे या दोन्ही प्रेमी युगलाचा लग्न तंमुसने लावून दिले होते. सदर दोन्ही लग्न आंतरजातीय आहेत, हे विशेष.