शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
2
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
3
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
4
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
5
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
6
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
7
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
8
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
9
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
10
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
11
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
12
रक्त चाचणी आता होईल केवळ ५८२ रुपयांत; हिमोफिलिया, व्हॉन विलेब्रडग्रस्तांचे पैसे वाचणार
13
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
14
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
15
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
16
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
17
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
18
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
19
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
20
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

क्षयरोग अधिकारी आणि कर्मचाऱ्यात हमरीतुमरी

By admin | Updated: December 11, 2014 23:08 IST

जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे गेल्या वर्षभरापासून पदभरती रेंगाळलेली आहे. सदर अधिकारी कर्मचाऱ्यांना वेतन व इतर भत्त्यांपासून सहा-सहा महिन्यापासून वंचित ठेवत आहे.

गोंदिया : जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे गेल्या वर्षभरापासून पदभरती रेंगाळलेली आहे. सदर अधिकारी कर्मचाऱ्यांना वेतन व इतर भत्त्यांपासून सहा-सहा महिन्यापासून वंचित ठेवत आहे. याबाबत एका कर्मचाऱ्याने त्यांना विचारपूस केली असता क्षयरोग अधिकाऱ्याने क्रोधात येवून सदर कर्मचाऱ्याला अपमानित केले. यावेळी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात झालेल्या हमरीतुमरीनेमुळे सदर कर्मचाऱ्याचा रक्तदाब अत्यंत कमी झाला व त्यांना त्वरित केटीएस रूग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले. हा प्रकार गुरूवारी ११ डिसेंबरच्या दुपारी २ वाजताच्या सुमारास जिल्हा क्षयरोग केंद्रात घडला. या घटनेबाबत क्षयरोग केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना लिखीत तक्रार दिली आहे. रूग्णालयात दाखल करण्यात आलेला कर्मचारी वरिष्ठ उपचार प्रयोगशाळा पर्यवेक्षक पदावर कार्यरत असून पवन वासनिक असे त्यांचे नाव आहे. वासनिक हे गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्यातील क्षयरोग कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी आहेत. त्यामुळे क्षयरोग कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे कार्य करतात.घडलेल्या या प्रकारानंतर क्षयरोग केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांची तक्रार केली. त्यानुसार प्रभारी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. विनोद वाघमारे हे अधिनस्त कर्मचाऱ्यांना नेहमीच मानसिक त्रास देतात. त्यात प्रामुख्याने दर महिन्याला पगार न करणे, कर्मचाऱ्यांचे टीए व डीए वेळोवेळी न देणे, जीपीएफ व सोसायटीच्या कर्मचऱ्यांच्या कर्ज देयकावर स्वाक्षरी न करणे, कर्मचाऱ्यांची हेतूपुरस्पर अनुपस्थिती लावणे, सुधारित राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत कर्मचारी दौऱ्यावर जाऊनसुद्धा हेतूपुरस्पर त्यांच्या दौऱ्यावर आक्षेप घेणे, कर्मचाऱ्यांना शासकीय कामाकरिता लागणारे स्टेशनरी फाईल्स, झेरॉक्स इत्यादी न पुरविने, तसेच कार्यरत कर्मचाऱ्यांना शासकीय कामासाठी लागणारे साहित्य टेबल, खुर्ची, कपाट इत्यादी वेळोवेळी निदर्शनास आणूणसुद्धा हेतूपुरस्पर विलंब करणे आदी बाबींचा समावेश आहे.अशा त्रासात कर्मचारी काम करीत असताना एखाद्या कर्मचाऱ्याचे बरेवाईट झाल्यास त्यास प्रभारी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.वाघमारे हे स्वत: जबाबदार असतील, असे निवेदनात नमूद केले. या सर्व कर्मचाऱ्यांनी जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांना बदलविण्याची मागणीसुद्धा केली आहे. तक्रारकर्त्यांमध्ये क्षयरोग केंद्रातील वरिष्ठ लिपीक पी.एस. नगरारे, कनिष्ठ लिपिक ए.टी. गजभिये, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ए.एम. लोणारे व आर.एम. रामटेके, शिपाही ए.डी. गुडपल्लीवार, पहारेकरी गिरीष तांबे, सफाईगार भरत मधूमटके, अधिपरिचारिका स्मृती वासनिक, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक हरीष चिंधालोरे, वरिष्ठ उपचार प्रयोगशाळा पर्यवेक्षक पवन वासनिक, योगिता अडसड यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)