शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात तिघांच्या खुनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2017 00:11 IST

गोंदिया शहर व अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या सिरेगावबांध येथे घडलेल्या दोन घटनांत तिघांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला.

गोंदिया व सिरेगावबांध येथील घटना : पोलिसांत आठ जणांवर गुन्हा दाखल लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : गोंदिया शहर व अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या सिरेगावबांध येथे घडलेल्या दोन घटनांत तिघांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. यात शहरातील घटनेत तरूणाला शनिवारी (दि.१३) रात्री १०.३० वाजता मारहाण करून त्याच्या खूनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. तर सिरेगावबांध येथील घटनेत सायंकाळी ६.४५ वाजता एका जोडप्याला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सविस्तर असे की, शहराच्या बाई गंगाबाई रूग्णालयाजवळ राहणाऱ्या रजत राज डहाट याला रेल्वे पोलिस ठाण्यांतर्गत खून केला होता अशी माहिती रेल्वे पोलिसांना का दिली म्हणून गढ्ढाटोली येथील कार्तिक गेंदलाल भालाधरे (२३) याने शनिवारी रात्री १०.३० वाजता आरोपी मोहम्मद बिरजा सिद्दीकी (२७,सिव्हील लाईन), आकाश राजकुमार रामटेके (१९,रा. गढ्ढाटोली) व इतर चार अशा सात जणांनी रॉड, चाकू व पाईपने प्राणघातक हल्ला चढविला. या संदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी आरोपीविरूध्द भादंविच्या कलम १४७, १४८, १४९, ३०७, ३२३, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तर अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत सिरेगावबांध येथे आरोपी राहुल नाशिक चाचेरे याने माझ्या पत्नीकडे वाईट नजरेने नेहमीच पाहतोस असे बोलून दिलीप सिताराम चिमणकर (४५) याना कुऱ्हाडीने मारले. त्यांच्या भांडणात मध्यस्ती करण्यासाठी गेलेल्या सरगर दिलीप चिमणकर (४०,दोन्ही रा. सिरेगावबांध) यांनाही ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत आरोपीविरूद्ध भादंविच्या कलम ३०७, ४५२, सहकलम ३ (२)(५) अनुसूचित जातीजमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे.