शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रयत्न करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 23:50 IST

वामा महिला सुरक्षा दलाने महिलांच्या अधिकारांची लढाई लढण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. क्षेत्रातील महिलांना आत्मनिर्भर बनविण्याचे हे प्रयत्न अधिक तीव्र करण्याची गरज आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : वामा महिला सुरक्षा दलाचा वार्षिकोत्सव थाटात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वामा महिला सुरक्षा दलाने महिलांच्या अधिकारांची लढाई लढण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. क्षेत्रातील महिलांना आत्मनिर्भर बनविण्याचे हे प्रयत्न अधिक तीव्र करण्याची गरज आहे. यासाठी शासकीय स्तरावर संभव सहकार्य करण्याची आमची भूमिका राहणार असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.येथील वामा महिला सुरक्षा दलच्यावतीने आयोजीत सहाव्या वार्षिकोत्सवात ते बोलत होते. कार्यक्रमाला बालाघाट नगर परिषदेचे अध्यक्ष अनिल धुवारे प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, समाजातील अनेक कुरीतींचे निर्मुलन व समाज सुधारणेसारखे रचनात्मक कार्यक्रम आयोजीत करून या संस्थेने आपल्या उद्देशांप्रती सजगता दाखविली आहे. यामुळेच मागील काही वर्षांत क्षेत्रातील महिलांमध्ये संस्थेप्रती विश्वास कायम झाल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सविता पुराम, नगर परिषद सभापती भावना कदम, नगरसेविका शिलू ठाकूर, मौसमी परिहार, महिला-बाल कल्याण अधिकारी सुजाता देशमुख, रूपाली सोयाम, ग्रामीणचे ठाणेदार दिनेश शुक्ला, राधिका कोकाटे, रजनी तुमसरे, मंजू कटरे, भावना अग्रवाल, अ‍ॅड. सुजाता तिवारी, डॉ. रिना रोकडे व अन्य उपस्थित होते. कार्यक्रमासाठी वामाच्या संगीता घोष, पुजा तिवारी, माधवी चुटेलकर, संगीता माटे, रिता चव्हाण, सुरभी जैन, सुषमा यदुवंशी, सानू बांडेबुचे, मेघा बोपचे, उन्नती बांडेबुचे, दिपाली राणे यांच्यासह अन्य सदस्यांनी सहकार्य केले.महिला सुरक्षा व जनजागृतीपर कार्यक्रमया कार्यक्रमात महिला पोलीस विभागाच्यावतीने निर्भया पथक महिला सक्षमीकरण प्रात्यक्षिक, निर्भया बेटी सुरक्षा अभियान, महिला बाल संगोपन, विद्यांजली शिक्षा सहसंस्कार, महिला आत्मसुरक्षा, छेडखानीच्या घटनांचा प्रतिकार करण्याच्या प्रकारांचे प्रदर्शन करण्यात आले. याशिवाय शौचालयांचा उपयोग, महिला आरोग्य व स्वच्छता, पर्यावरण सुरक्षा, वृक्षारोपण, पाणी वापर, पावसाच्या पाण्याचे संवर्धन, भ्रूण हत्या, हुंडा निर्मुलन आदि विषयांवर जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल