शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतीचे खरे प्रतिबिंब म्हणजेच साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 22:05 IST

लेखन व्यक्तीच्या जडणघडनेत महत्वाची भूमिका बजाविते. तसेच लेखनीतून साकार झालेल्या साहित्यातून क्रांती घडू शकते. हे ध्यानात घेऊन साहित्यिकाने एखाद्या मृत शब्दात इतकी ताकद भरायला हवी की समाज जीवनात आमूलाग्र बदल होऊ शकेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक लखनसिंह कटरे यांनी केले.

ठळक मुद्देलखनसिंह कटरे : बोरकन्हार येथे झाडीबोली साहित्य मंडळ शाखेचे पुनर्गठन

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरीटोला : लेखन व्यक्तीच्या जडणघडनेत महत्वाची भूमिका बजाविते. तसेच लेखनीतून साकार झालेल्या साहित्यातून क्रांती घडू शकते. हे ध्यानात घेऊन साहित्यिकाने एखाद्या मृत शब्दात इतकी ताकद भरायला हवी की समाज जीवनात आमूलाग्र बदल होऊ शकेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक लखनसिंह कटरे यांनी केले.बोरकन्हार येथे झाडीबोली साहित्य मंडळाच्या शाखेचे पुनर्गठण करण्यात आले. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.या वेळी मंडळाच्या नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तंटामुक्त समितीच्या सभागृहात सदर कार्यक्रम घेण्यात आला. उद्घाटन रौप्य महोत्सवी झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख प्रा.मिलिंद रंगारी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष वासुदेव रहागंडाले , सौंदड येथील कवी चंदू पाथोडे, सुखचंद वाघमारे, युवा कवी पवन पाथोडे आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक सुखचंद वाघमारे यांनी मांडले. त्यानंतर शाखाध्यक्ष देवेंद्र रहागंडाले यांच्या नेतृत्वातील कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. प्रा. मिलिंद रंगारी यांनी जिल्ह्यातील झाडीबोली चळवळीच्या कार्याचा आढावा घेतला.याप्रसंगी बंडोपंत बोढेकर म्हणाले, झाडीबोली आपल्या अस्मितेचे प्रतिक आहे. बोलीमुळे आपल्या पुर्वजांची वाणी जतन करू शकतो. राष्ट्रसंतांनी झाडीपट्टी प्रदेशावर अपार प्रेम केले आणि या बोलीचा सुगंध आपल्या साहित्यातून सर्वदूर पसरविला. या वेळी वरोरा येथील आचार्य ना.गो. थुटे यांनी पाठविलेला ग्रंथ संच बोरकन्हार शाखेला बंडोपंत बोढेकर यांनी प्रदान केला.यावेळी झालेल्या कवी संमेलनात प्रा. मिलिंद रंगारी यांनी झाडीपट्टीला मानवंदना करणारी ‘झाडीची माती’ ही कविता सादर केली. तर सुशील खापर्डे यांनी ‘रित खराब हाय’ ही झाडीची कविता ऐकविली. तसेच देवेंद्र रहागंडाले यांनी ‘नायलॉनच्या रस्सीवर’ या कवितेतून शेतकऱ्यांचे दु:ख मांडले.दंडार कलावंत ग्यानीराम कटकवार यांनी ‘आम्ही मायबाप पापी’ या कवितेतून मुलींच्या बापाची व्यथा मांडली. तर राजेश कटरे यांनी ‘इस्कूलचा पयला दिवस’ या झाडीबोली कवितेतून बालपणाच्या शाळेच्या आठवण करून दिली. रमणदास बांबोर्डे यांच्या ‘अडसर नाही आणू, चंदू पाथोडे यांनी ‘माझा बाप’ या सामाजिक जाणिवेच्या कवितेने उपस्थितांना रिझविले. युवा कवी पवन पाथोडे यांनी चारोळ्या सादर केल्या.त्यानंतर आपल्या स्वरचित ‘मायमाऊली या कवितेचे गायन करून रसिसकांना मंत्रमुग्ध केले. संचालन अनिल शहारे यांनी केले. आभार सुशील खापर्डे यांनी मानले.