शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जीवनाचा खरा सार राष्ट्र संताच्या ग्रामगीतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 21:13 IST

वंदनीय राष्ट्रसंताची ग्रामगीता गावखेड्यातील सामान्य ग्रामनाथाला अर्पण केली आहे. ग्रामगीतेमध्ये सांगीतल्या प्रमाणे राष्ट्राचे भविष्य घडविण्यासाठी सुसंस्कारीत बालक तयार करण्याचे प्रशिक्षण राष्ट्रधर्म प्रचार समिती गुरुकुंज मोझरीद्वारे प्रशिक्षीत शिक्षक करीत आहेत.

ठळक मुद्देहरिभाऊ वेरूळकर : खांबी येथील सुसंस्कारीत शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : वंदनीय राष्ट्रसंताची ग्रामगीता गावखेड्यातील सामान्य ग्रामनाथाला अर्पण केली आहे. ग्रामगीतेमध्ये सांगीतल्या प्रमाणे राष्ट्राचे भविष्य घडविण्यासाठी सुसंस्कारीत बालक तयार करण्याचे प्रशिक्षण राष्ट्रधर्म प्रचार समिती गुरुकुंज मोझरीद्वारे प्रशिक्षीत शिक्षक करीत आहेत. सर्वधर्म समभावाची शिकवण देणारी ग्रामगीता विज्ञानावर आधारीत आहे. या प्रशिक्षणातून घडणारे बालक स्वत:चे व राष्ट्राचे भविष्य उज्वल करणार असून जिवनाचा खरा सार राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रधर्म प्रचार समितीचे (गुरुकुंज मोझरी)े आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजी यांनी केले.ग्राम खांबी येथील १० दिवसीय प्रशिक्षण शिबिराला त्यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी लाठीकाठी, मल्लखांब, बौद्धीक व शारीरिक वर्गाचे अवलोकन करुन समाधान व्यक्त केले. तर सायंकाळी सामुदायीक प्रार्थनेनंतर सुसंस्कारी शिबिरातील मुलांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.या वेळी त्यांनी तुकडोजी महाराजांच्या सोबतीच्या जीवनातील आठवणींना उजाळा दिला. पाप आणि पुण्य मला मोजता येत नाही. यज्ञात किती तुप जाळल्याने पुण्य घडते हे सुद्धा मला निश्चित सांगता येत नाही. परंतु बालके शिबिराच्या माध्यमातून सुसंस्कारीत केले तर निश्चितच पुण्य लाभते, हा माझा ठाम विश्वास असल्याचे ते म्हणाले. संस्कृत व मराठी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या गुुरुजींनी या वेळी ग्रामगीतेवर सखोल कथन केले.अठराव्या वर्षी हिमालयातील गुरुकुलात संस्कृत शिकून राष्ट्रसंतांचे सानिध्य आणि संस्कारीत राष्ट्र घडविण्यासाठी १९८१ पासून पहिल्या सुसंस्कार शिबिरातील १८ मुलांपासून सुरु केलेल्या शिबिरात दरवर्षी महाराष्ट्रात ६० शिबिरात हजारो विद्यार्थी प्रशिक्षण घेत असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.वयाचे ८५ वर्षे ओलांडलेल्या आचार्य वेरूळकर गुरुजींनी १२ ते १८ वयोगखालील शिबिरातील मुला-मुलींना मित्रहो या शब्दांनी हाक दिली. यावेळी राष्ट्रहितासाठी काम करण्यासाठी आपण प्रशिक्षीत होवून राष्ट्रधर्म जागवावे, सुजान, सज्ञान होवून आई-वडील व देशाची सेवा करावी असा मौलिक संदेश दिला.कार्यक्रमाला साबळे महाराज, संकेत काळे महाराज, किशोर रायबोले, रुषल पांडे, गणेश बोदडे, पवन धानोरकर, रवी गायकवाड, दुर्योधन मैद, जि.प.सदस्य कमला प्रमोद पाऊलझगडे, समर पचारे, प्रफुल कपले, विजयसिंह राठौड, खांबीचे सरपंच प्रकाश शिवणकर, शिबिर प्रमुख कृष्णकांत खोटेले, जयंत खोटेले, उध्दव मेहेंदळे, भोजराम रहेले तसेच शिबिरार्थी व गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.