शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सौंदडमध्ये ट्रामा केअर सेंटरसाठी प्रयत्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2017 00:53 IST

सौंदड येथील ग्रामीण रुग्णालयात ट्रामा केअर सेंटर तर सडक/अर्जुनी

पालकमंत्री बडोले : घटेगाव येथे आरोग्य उपकेंद्राचे भूमीपूजन \सौंदड : सौंदड येथील ग्रामीण रुग्णालयात ट्रामा केअर सेंटर तर सडक/अर्जुनी ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रु ग्णालयाचा दर्जा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, तसेच घटेगाव व परिसरातील गावातील विविध समस्या सोडविल्या जात असल्याची माहिती पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. सडक/अर्जुनी तालुक्यातील घटेगाव येथे १२ फेब्रुवारी रोजी आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे भूमीपूजनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात बडोले बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती कविता रंगारी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य श्रीमती शिला चव्हाण, पंचायत समिती सदस्य राजेश कठाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.डी.वाय. ब्राम्हणकर, घटेगावच्या सरपंच रेखा कोसलकर, उपसरपंच कांता गायधने, पोलीस पाटील कुंदा नेवारे, प्रतिष्ठीत नागरिक विष्णुजी अग्रवाल यांची उपस्थिती होती. पालकमंत्री पुढे म्हणाले, पूर्वी डॉक्टर गावात उपलब्ध नसल्यामुळे लोक वैदू, मरीमायच्या मागे लागायचे. आता लोकांचा शिक्षणावर भर असल्यामुळे आरोग्याच्या बाबतीत सुधारणा झाल्या आहेत. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या इमारती उभारुन आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करु न देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तालुक्यातील चिखली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे भूमीपूजन तर भिवखिडकीच्या आरोग्य केंद्राचे कोकार्पण लवकरच करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सभापती रंगारी म्हणाल्या, पूर्वी घटेगाव परिसरातील लोकांना आरोग्याच्या सुविधा मिळण्यासाठी बाहेरगावी जावे लागत होते. आता या उपकेंद्र इमारतीच्या बांधकामामुळे आरोग्यविषयक सुविधा इथेच मिळण्यास मदत होणार आहे. पालकमंत्री हे जिल्ह्याचेच असल्यामुळे अनेक कामे त्यांनी मंजूर केली आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांनी घेण्यासाठी त्यांनी विविध योजनांची माहिती जाणून घ्यावी असेही त्यांनी सांगितले. श्रीमती चव्हाण म्हणाल्या, घटेगावसाठी आरोग्य उपकेंद्राची इमारत होणे ही आनंदाची बाब आहे. घटेगाव हे अनेक समस्यांनी ग्रस्त गाव आहे. पूर्वी या परिसराच्या विकासाकडे दुर्लक्ष होत होते. पालकमंत्र्यांनी या भागाकडे लक्ष दिल्यामुळे विकासाला गती मिळाली आहे असे त्या म्हणाल्या. सरपंच श्रीमती कोसलकर म्हणाल्या, आरोग्य उपकेंद्र मंजूर करण्यासाठी अनेक अडचणी आल्यात. गावात बसची सुविधा नाही. पिण्याच्या पाण्याची अडचणी आहे. ग्रामपंचायतीची इमारत नादुरु स्त आहे. या समस्या पालकमंत्री निश्चित सोडवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्र माला डॉ.गुंड व आरोग्य विभाग कर्मचारी तसेच घटेगावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार उरकुडे यांनी मानले. (वार्ताहर)