शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तिरोडा पंचायत समितीचा अजब कारभार उघड

By admin | Updated: September 4, 2015 01:41 IST

तिरोडा पंचायत समिती अंतर्गत सन २००९ मध्ये परसवाडा येथील ताराबाई गोपीचंद शहारे यांना घर मंजूर झाले होते.

परसवाडा : तिरोडा पंचायत समिती अंतर्गत सन २००९ मध्ये परसवाडा येथील ताराबाई गोपीचंद शहारे यांना घर मंजूर झाले होते. पण इंदिरा आवास तयार न करता व पंचायत समितीचे तत्कालीन कनिष्ठ अभियंता लिल्हारे यांनी कसलीही चौकशी न करता साटेलोटे करुन संपुर्ण देयक दिले असल्याचे माहितीच्या अधिकारात उघडकीस आले.दि. ३० मार्च २००९ ला १० हजार रुपयांचा चेक अग्रीम देण्यात आला. चेक क्र. ८६७०४८ असून दुसरा धनादेश क्र.५६९१७६ रुपये १५ हजार दि.३/८/२००९ ला देण्यात आला. सदर महिलेने घराचे फाऊंडेशनही खोदले नाही व बांधकाम केलेच नाही. अभियंता व खंडविकास अधिकाऱ्यांनी पैसे दिले कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ताराबाई शहारे यांचा घरकुलाचा करारनामा १०० रुपयांच्या स्टँप पेपरवर असून दि. २५ मे २००९ ला करण्यात आला. करारनामाच्या आधी चेक क्र. ८६७०४८ नुसार १० हजार दि. ३१ मार्च २००९ ला कसे काय देण्यात आले? त्यावेळी तत्कालीन खंडविकास अधिकारी मसराम होते. नंतर प्रभारी प्रकाश गंगापारी व प्रभारी अरुण गिऱ्हेपुंजे या तीन अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने देयक देण्यात आले. सर्व खंडविकास अधिकारी बदलले. गावातील अतुल मेश्राम, राकेश वैद्य यांरी सदर प्रकरण माहितीच्या अधिकारात उघडकीस आणले.महिला विधवा असून परिस्थिती गरिबीची असल्याने ग्राम पंचायतीने घरकुल मोजनेसाठी नाव पाठविले होते. पण सदर महिलेने घर तयार न करता आपले जुने घर त्याच ठिकाणी ठेवून दुसऱ्याचे घर व शौचालय दाखवून धनादेशाची उचल केली, पण कनिष्ठ अभियंता यांनी देयक दिले कसे उपमोजीता प्रमाणपत्र ग्रामसेवकाकडून मागीतले जाते, ग्रामसेवकाने ते दिले कसे? यात सर्वांचे हात ओले झाले असल्याचे स्पष्ट दिसत आहे.सदर प्रकरणाची चौकशी करावी. अशा प्रकारे अनेक गावात काम न करता देयक देण्यात आल्याचे कळते.