शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
2
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
3
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
4
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
5
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
6
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
7
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
8
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
9
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
10
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
11
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
12
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
13
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
14
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
15
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
16
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
17
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
18
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
19
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
20
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी

आदिवासी सह.संस्थेत सात लाखांचा अपहार

By admin | Updated: April 26, 2017 00:38 IST

आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या.सडक अर्जुनी (र.नं. १३३२) या सहकारी संस्थेच्या संचालकांनी

अंकेक्षण अहवाल सादर : आठ जणांवर गुन्हे दाखल सडक-अर्जुनी : आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या.सडक अर्जुनी (र.नं. १३३२) या सहकारी संस्थेच्या संचालकांनी अपहार झाल्याची तक्रार केल्यानंतर सहकारी संस्था देवरीच्या प्रमाणित लेखा परिक्षकांनी अंकेक्षण अहवाल सादर केला. त्यात ६ लाख ९९ हजार ३५ रुपयांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे आठ व्यक्तीवर डुग्गीपार पोलिसांनी भादंवि कलम ४२०, ४०९ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे. संस्थेच्या उपविहित नमुद केल्याप्रमाणे संस्था आपल्या सभासदांना जिल्हा मध्यवर्ती अधिकोष यांचेमार्फत आवश्यक गरजेप्रमाणे अल्पमुदतीत किसान क्रेडिट कार्डधारकांना कर्जवाटप करणे, मध्यम मुदती कर्ज पुरवठा करणे, आदिवासी विकास महामंडळामार्फत आदिवासी सभासदांना खावटी कर्ज वाटप करणे, एकाधिकार हमीभाव, धान खरेदी व्यवहार हाताळणे हे उद्देश ठेवून संस्थेची प्रगती करणे महत्वाचे असते. असे असताना सडक-अर्जुनीच्या आदिवासी सहकारी संस्थेने चांगलाच उपक्रम राबविल्याचे दिसून आले. १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीत संस्थेच्या काही लोकांनी सरकारी आणि शेतकऱ्यांचे असे मिळून ६ लाख ९९ हजार ३५ रुपये एवढी अफरातफर करुन शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे तक्रारीच्या अनुषंगाने लेखा परीक्षक एस.बी. बिंझाडे यांनी दिलेल्या आपल्या अंकेक्षण अहवालात सिद्ध झाले. त्या अहवालाचा आधार घेऊन परीक्षक बिंझाडे यांनी डुग्गीपार पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. आदिवासी सहकारी संस्थेत एवढा मोठा अपहार झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा सदर संस्थेचा विश्वास उडाला आहे. विश्वासघात करणाऱ्या आदिवासी सहकारी संस्थेच्या आरोपीवर त्वरित कारवाई व्हावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा संस्थेच्या इतर सदस्यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी) या आरोपींचा समावेश डुग्गीपार पोलीस स्टेशनला आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ठाणेदार केशव वावळे यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन बिंझाडे यांच्या अंकेक्षण अहवालानुसार आणि तक्रारीनुसार आरोपी श्रीराम चमरु भोयर रा.तिडक, विशाल श्रीराम भोयर, मंमेश भारत मेश्राम, पवन देवराम कापगते, खालीलअली आविदअली सैय्यद, प्रमिलाबाई देवराम कापगते, सडक-अर्जुनी, शांतीबाई फुलचंद नागदेवे, तिडका बकाराम तुकाराम खोटेले, रा.केसलवाडा यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. त्यांच्यावर डुग्गीपार पोलीस स्टेशन येथे कलम ४२० व ४०९ गुन्हा दाखल केला आहे.