शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

आदिवासी,भटके मागासवर्गीयांची उपेक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 21:40 IST

देशाला स्वातंत्र्य मिळून ७२ वर्ष पूर्ण होऊनही स्वातंत्र्य, समता,न्याय हक्कापासून आजही गरीब आदिवासी माणूस किंवा गैरआदिवासी दूर आहे.आदिवासींना अद्यापही माणूस समजून काही भागात वागणूक दिली जात नाही.

ठळक मुद्देउषाकिरण आत्राम : ५०० हून अधिक कवितांचे लेखन, ३२ वर्षांचा साहित्य प्रवास

विजय मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : देशाला स्वातंत्र्य मिळून ७२ वर्ष पूर्ण होऊनही स्वातंत्र्य, समता,न्याय हक्कापासून आजही गरीब आदिवासी माणूस किंवा गैरआदिवासी दूर आहे.आदिवासींना अद्यापही माणूस समजून काही भागात वागणूक दिली जात नाही. हे स्वतंत्र भारतातील लोकशाहीचे करंडेपण आणि दुर्भाग्यच असल्याचे महाराष्ट्रातील प्रथम आदिवासी कथाकार व कवयित्री उषाकिरण आत्राम यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.उषाकिरण आत्राम म्हणाल्या, जगात भारताचा महासत्ता म्हणून गौरव होतो. हजारो योजनांची घोषणा केली जाते. पण यानंतरही आदिवासी, गरीब भटके, मागासवर्गीयांचे पात्र मात्र कोरडेच दिसून येते. आजही अनेक ठिकाणी लोकांना दोन वेळचे चांगले जेवण अन राहायला झोपडी नाही. स्त्रीया सुरक्षित नाही.न्याय, समता, स्वातंत्र्य त्यांचेकडे पाठ फिरवून आहे. त्याकडे डोळे उघडे ठेवून समाजाने प्रत्येक माणसाने, प्रशासनाने पहावे व त्यांचा दाबलेला आवाज किंकाळ्या आक्रोश ऐकावा. त्यांना न्याय द्यावा त्यांनाही आनंदाने जीवन जगू द्या, खोट्या प्रतिज्ञा घेवू नका, दुखी कष्टी शोषीत पिडीतांचे अश्रू पुसण्यासाठी प्रयत्न करावे हेच भारताला महासत्ता म्हणून गौरव करणारे ठरेल,अशी भावना त्यांनी व्यक्त केली. शोषीत पिडीत आदिवासी समाजाचे वास्तव्य आपल्या लेखनीच्या माध्यमातून जगासमोर ठेवणाऱ्या उषाकिरण आत्राम यांनी आपल्या ३२ वर्षाच्या साहित्य प्रवासात शेकडो कविता आणि कथा नाटक इत्यादी रचना केला. त्यांनी आपल्या काव्य रचनेत आणि कथा संग्रहात आदिवासी समाजाचे जीवन दर्शन, त्यांचे प्रकृती प्रेम, पर्यावरण रक्षणासाठी पाळणारे नियम त्यातल्या त्यात उच्चवर्णीय लोकांनी आदिवासी समाजावर केलेले अत्याचार स्त्रीयांवरील अत्याचार व शोषण याबाबत अनेक ठिकाणातील जीवंत उदाहरणसह आपल्या साहित्य रचनेत उल्लेख केला आहे. त्याचे कथा संग्रह आणि कविता नांदेड, पुणे, मुंबई, अमरावती विद्यापीठात शिकविले जात आहेत.त्यापूर्वी लातूर, जळगाव विद्यापीठातून सुध्दा कविता शिकविण्यात आल्या. काही कविता बालभारतीने सुध्दा स्विकारल्या. राज्य शिक्षण मंडळात दहाव्या वर्गाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केल्या आहेत. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील अभ्यासक्रमात सुध्दा लेख आणि कवितांचा समावेश झालेला आहे. मुळच्या चंद्रपूर जिल्ह्यातील असणाºया उषाकिरण आत्राम यांनी सेवानिवृत्तीनंतर सालेकसा तालुक्यातील धनेगाव येथे मागील सहा वर्षापासून स्थायी झाल्या आहेत. त्यांनी धनेगाव येथे आदिवासी भाषा संशोधन व विकास प्रकल्प स्थापन केला आहे. अतिप्राचीन गोंडी भाषा पुनर्जिवीत करण्यासाठी सतत धडपड करीत आहेत.गोंडी भाषेला केंद्र शासनाच्या आठव्या अनुसूचीमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी अनेकदा दिल्लीत जाऊन पाठपुरावा केला. १९७७ मध्ये ‘आई’ नावाच्या कवितेच्या रचनेपासून आपला साहित्य प्रवास सुरु केला. ग्रामसेविका म्हणून प्रथम शासकीय नोकरी एटापल्ली सारख्या सुदूर जंगल क्षेत्रात जाऊन केली. पुढे बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि खंडविकास विकास अधिकारी म्हणून जवाबदारी पार पाडली.पण या दरम्यान त्यांचा साहित्य प्रवास अविरत सुरू राहिला. आतापर्यंत त्यांनी ५०० पेक्षा जास्त कविता लिहिल्या असून या कविता मराठी गोंडी आणि हिंदी भाषेत सुध्दा आहेत. शेकडो लेख व कथा आणि नाटकांची सुध्दा रचना त्यांनी केलेली आहे. त्यांचे पती सुन्हेरसिंह ताराम एका मासिकाचे संपादक होते. काहीच दिवसांपूर्वी त्यांचे हद्य विकाराने निधन झाले. आज त्या एकट्या पडल्या असल्यातरी त्यांनी आपल्या लेखनात खंड पडू दिला नाही. तर पतीचे अर्धवट असलेले लेखन कार्य पूर्ण करण्यासाठी ही त्या परिश्रम घेत आहेत.