शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणाच्या संतुलनासाठी वृक्ष संवर्धन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 23:20 IST

दिवसेंदिवस निसर्गाचे संतुलन ढासळत आहे. अवैध वृक्षतोडीने पावसाचे प्रमाण कमी होते. मानवाच्या आरोग्यासाठी आल्हाददायक नैसर्गिक वातावरण फार निकडीचे झाले आहे.

ठळक मुद्देपालकमंत्री : झरपडा येथील मिश्र रोपवनाला भेट

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : दिवसेंदिवस निसर्गाचे संतुलन ढासळत आहे. अवैध वृक्षतोडीने पावसाचे प्रमाण कमी होते. मानवाच्या आरोग्यासाठी आल्हाददायक नैसर्गिक वातावरण फार निकडीचे झाले आहे. वातावरणाचे संतुलन कायम ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी गावाशेजारील जंगल कायम ठेवण्यासह वृक्ष संवर्धनासाठी स्वयंप्रेरणेने पुढे येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.अर्जुनी-मोरगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाºया झरपडा येथील मिश्र रोपवनाला भेट देवून पाहणी करताना ग्रामस्थांशी हितगुज साधताना ते बोलत होते.अर्जुनी-मोरगाव वनविभागाच्या वतीने २०१७ मध्ये झरपडा येथे संयुक्त वन व्यवस्थापन समिती तसेच वनविभागाच्या संयुक्त विद्यमाने १५ हे.आर. क्षेत्रामध्ये मिश्र रोपवनाची निर्मिती करण्यात आली. त्यामध्ये जुलै महिन्यात विविध प्रजातींच्या लाखो वृक्षांची लागवड करण्यात आली होती. अल्पावधीतच रोपट्यांची वाढ झालेली दिसत आहे. निसर्गरम्य वातावरण निर्मितीचा देखावा असलेल्या मिश्र रोपवनाला पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी भेट देवून रोपवनाची पाहणी केली.यावेळी जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, बाजार समितीचे उपसभापती लायकराम भेंडारकर, कंत्राटदार तथा खरेदी विक्री समितीचे संचालक विनोद नाकाडे, अर्जुनी नगर पंचायतचे उपाध्यक्ष विजय कापगते, पं.स. सभापती अरविंद शिवणकर, झरपडाचे नवनिर्वाचित सरपंच कुंदा डोंगरवार, वनसमितीचे अध्यक्ष मुन्नालाल बोरकर, वनपरिक्षेत्राधिकारी सी.जी. रहांगडाले प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी वनविभागाचे क्षेत्र सहायक एच.टी. खडसे, बरडे, पी.के. ब्राम्हणकर, जे.जी. नागपुरे, बी.एच. सुलाखे, एस.एन. पंधरे यांनी रोपवनाची माहिती पालकमंत्र्यांना दिली.रोपवनातील वृक्षांची झालेली वाढ पाहून ना. बडोले यांनी समाधान व्यक्त केला. तसेच वृक्ष संवर्धनासाठी जनतेने स्वयंप्रेरणेने पुढे यावे, असे आवाहन केले.