लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : संक्रांतीनिमित्त पतंग उडविण्याची एक परंपराच चालत आली आहे. यामुळेच संक्रांतीच्या दिवशी लहान्यांपासून मोठेही पंतगबाजी करतात. यात पतंगबाजीत मांजामुळे जखमी झालेल्या सात पक्ष्यांवर वन्यपक्षी औषधोपचार शिबिरात उपचार करून जीवदान देण्यात आले.मकर संक्रांतीत महिला पूजा व हळदीकुंकूत व्यस्त असतानाच लहान मुले व पुरूष पतंग उडविण्यात व्यस्त असतात. एक कटली तर दुसरी हा क्रम दिवसभर चालत असतो. त्यात आता मात्र ही पतंगबाजी आनंदाच्या पलीकडे जाऊन जीवघेणी ठरू लागली आहे. कारण पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साध्या दोऱ्याच्या जागी आता नायलॉन मांजा बाजारात आला आहे. या नायलॉन मांजामुळे पक्षीच काय मनुष्याचाही जीव धोक्यात आला आहे. कित्येकांचे गळे व कान या मांजामुळे कापले गेल्याच्या घटना मकरसंक्रांतीत नेहमीच घडतात. मात्र मानवाकडे उपचाराची सोय असल्याने ते आपला जीव वाचवून घेतात. तर दुसरीकडे पक्षी मात्र तडफडत मरून जातात व त्यांच्याकडे कुणाचेही लक्ष जात नाही.माणूस आपल्या आनंदसाठी उडवित असलेली पतंग मुक्या पक्ष्यांचा जीव घेते. मकरसंक्रांतनिमित्त करण्यात येत असलेल्या एका दिवसाच्या पतंगबाजीत मांजामुळे जखमी होऊन हजारोंच्या संख्येत पक्ष्यांचा जीव जातो. नेमकी हीच बाब हेरून येथील पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग व वन परिक्षेत्र कार्यालयाच्यावतीने १५ ते १७ जानेवारीदरम्यान वन्यपक्ष औषधोपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरांतर्गत डॉ.विवेक गजरे व डॉ.विशाल आडे यांनी राज्य पक्षी असलेल्या हरियल व सात कबूतरांवर औषधोपचार करून त्यांना जीवदान दिले. विशेष म्हणजे, या शिबिरांतर्गत ग्राम अदासी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात चर्चासत्राचे आयोजन करून पक्षीप्रेमींना मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी सुशिल निनावे व पशु चिकित्सक डॉ.रेणुका शेंडे यांनी सहकार्य केले.
मांजामुळे जखमी झालेल्या सात पक्ष्यांवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 06:00 IST
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : संक्रांतीनिमित्त पतंग उडविण्याची एक परंपराच चालत आली आहे. यामुळेच संक्रांतीच्या दिवशी लहान्यांपासून मोठेही पंतगबाजी ...
मांजामुळे जखमी झालेल्या सात पक्ष्यांवर उपचार
ठळक मुद्देवन्यपक्षी औषधोपचार शिबिर : पक्षी प्रेमींनाही केले मार्गदर्शन