शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

विना राॅयल्टी रेतीची वाहतूक : १६ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:25 IST

तिरोडा : शून्य रॉयल्टी उपलब्ध नसतानाही परराज्यातून महाराष्ट्रात अनेक वाहने गौण खनिज घेऊन येतात, असेच रेती भरून परराज्यातून ...

तिरोडा : शून्य रॉयल्टी उपलब्ध नसतानाही परराज्यातून महाराष्ट्रात अनेक वाहने गौण खनिज घेऊन येतात, असेच रेती भरून परराज्यातून येणाऱ्या एकूण ६ टिप्परला पकडून त्यांच्यावर १६ लाख ६२ हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. ही कारवाई १७ फेब्रुवारीच्या पहाटे ४ वाजताच्या सुमारास करण्यात आली. तिरोडा येथे नुकतेच रुजू झालेले उपविभागीय अधिकारी अजयकुमार नाष्टे, महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे ही कारवाई केली.

प्राप्त माहितीनुसार मध्य प्रदेशातून रेती भरलेले एकूण ६ टिप्पर खैरलांजी-तिरोडा मार्गाने येत होते. दरम्यान, उपविभागीय अधिकारी नाष्टे यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार प्रशांत घोरुडे व महसूल विभागाचे इतर अधिकारी व पोलीस प्रशासनाने कारवाई करून सदर टिप्पर जप्त करून तहसील कार्यालय परिसरात जमा केले. जप्त करण्यात आलेल्या टिप्परमध्ये सौरभ ठामेंद्रसिंह चौहान रा.तिरोडा याचा टिप्पर क्रमांक एमएच-३६/एए-२३५८ व एमएच-३६/एए-१२५१, सुनील बचवानी रा. तिरोडा याचा टिप्पर क्रमांक एमएच-४०/बीजी-०५४०, गणेश देशमुख रा.ता. हिंगणा, जिल्हा नागपूर याचा टिप्पर क्रमांक एमएच-४०/बीएल-४३६२, हरिष अशोक बांदे रा. नागपूर याचा टिप्पर क्रमांक एमएच-४०/बीजी-४४५२ व उमेश शहारे रा. दाभा, ता.जि. भंडारा याचा टिप्पर क्रमांक एमएच-३६/एफ-३५७३ यांचा समावेश आहे. सर्व टिप्पर जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहेत. प्रत्येकी ५ ब्रास रेती व एका वाहनावर दंड असा २ लाख ७७ हजार रुपये दंड, याप्रमाणे एकूण जप्त करण्यात आलेल्या रेती व ६ टिप्परवर एकूण १६ लाख ६२ हजार रुपयांचा दंड आकरण्यात आलेला आहे.

....

कोट

परराज्यातून आलेला वाळूचा साठा व निर्गतीबाबत कार्यपद्धती महाराष्ट्र शासनाने ५ फेब्रुवारी, २०२१ रोजी जाहीर केलेली आहे. त्या अनुषंगाने परराज्यातून जे गौण खनिज येतात, त्यामधील रॉयल्टीची १० टक्के रक्कम जिल्हा खनिज प्रतिष्ठानाला जमा करणे अपेक्षित आहे. त्यानंतर, ० रॉयल्टी प्राप्त करून त्यावर वाहतूक करणे अपेक्षित आहे. मात्र, बरीच वाहने परराज्यातून महाराष्ट्रात येत असताना, शून्य रॉयल्टी त्यांच्याकडे उपलब्ध नसल्यामुळे ते वाहने जप्त करून तहसील कार्यालयात लावण्यात आलेले आहेत. वसुलीची कारवाई त्यांना नोटीस बजावून करण्यात येत आहे.

- प्रशांत घोरुडे, तहसीलदार, तिरोडा