शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून पळसगाव राका शाळेचा कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:21 IST

गोंदिया : पंचायत समिती सडक-अर्जुनी अंतर्गत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पळसगाव-राका गावकऱ्यांच्या सहकार्याने शाळेतील शिक्षकांनी सुंदर रंगरंगोटी करून ...

गोंदिया : पंचायत समिती सडक-अर्जुनी अंतर्गत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पळसगाव-राका गावकऱ्यांच्या सहकार्याने शाळेतील शिक्षकांनी सुंदर रंगरंगोटी करून व कोरोना काळात विविध शैक्षणिक उपक्रम राबवून शाळेचा कायापालट केला आहे. त्यामुळे या शाळेची जिल्ह्यात सध्या चांगलीच चर्चा आहे.

पळसगाव-राका हे १७५२ लोकवस्तीचे गाव आहे. येथे पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा असून मुख्याध्यापक एस. आर. फुंडे, पदवीधर शिक्षक संदीप तिडके, भास्कर नागपुरे ,साहाय्यक शिक्षक नितीन अंबादे व एस. टी. कापगते यांनी शाळेत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून कोरोनासारख्या भीषण परिस्थितीत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व संगणकीय विकास घडविण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली आहे. तंत्रस्नेही शिक्षक भास्कर नागपुरे यांच्या प्रयत्नामुळे इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थी संगणक चांगल्या प्रकारे हाताळतात. तीन महिन्यांपूर्वी शाळेत रुजू झालेले पदवीधर शिक्षक संदीप तिडके यांनी आपल्या संकल्पनेतून शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, गावकरी व शाळेतील सहकारी शिक्षक बांधव यांच्या सहकार्याने लोकसहभागातून शाळेला आकर्षक रंगरंगोटीद्वारे नवरूप प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. विविध सामाजिक प्रबोधनदर्शक तक्ते व शैक्षणिक स्वरूपाचे तक्ते भिंतीवर काढून विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करण्यास 'बोलकी शाळा' तयार केली. शाळा संपूर्ण डिजिटल असून दोन प्रोजेक्टर संच शाळेत उपलब्ध आहेत. विद्यार्थी अतिशय मनमोकळेपणाने वाचन कुटीच्या सान्निध्यात शिक्षण घेतात. शिक्षक व गावकऱ्यांच्या मदतीने स्वखर्चातून शाळेची रंगरंगोटी करून शाळा परिसर आकर्षित केला आहे. गावकऱ्यांच्या मदतीने अनेक भौतिक सुविधा शाळेत तयार करण्यात आल्या आहेत. सोबतच १४ वित्त आयोगामधून मागील दोन वर्षांमध्ये शाळेत मॉडेल शौचालय तयार करण्यामध्ये ग्रामपंचायतचा महत्त्वाचा वाटा आहे. शाळेच्या विकासासाठी गटशिक्षणाधिकारी के. वाय. सर्याम, केंद्रप्रमुख डी. झेड. लांडगे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भाष्कर मानकर, उपाध्यक्ष धनराज येरपुडे, सरपंच भारती लोथे, उपसरपंच सुनील चांदेवार, माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य सुभाष कापगते, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक संघामधील सर्व सदस्य तथा सर्व पालकवर्ग यांचे सहकार्य मिळत आहे.

.........

बॉक्स

सुसज्ज वाचनकुटी

स्वखर्चाने कुसुम कापगते यांनी स्व. चैतराम कापगते यांच्या स्मरणार्थ ६० हजार रुपयांपेक्षा खर्च करून वाचनकुटी तयार करून दिली आहे. जिल्ह्यातील अनोख्या प्रकारची वाचनकुटी तयार करून शाळेने विद्यार्थ्यांना हक्काचे ज्ञानकक्ष तयार करून दिले आहे.

............

बॉक्स

करूया मैत्री संगणकाशी

वर्ग पाचवी ते सातवीपर्यंत शिक्षक असणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी संगणक हाताळतात. टायपिंग करणे, फाईल तयार करणे, शालेय शिष्यवृत्ती प्रपत्रे भरून काढणे, मोबाईल संगणकाला कनेक्ट करणे यासारखे अनेक कामे विद्यार्थी संगणकावर करतात. यासाठी पदवीधर शिक्षक भास्कर नागपुरे व नितीन अंबादे परिश्रम घेत आहेत.