संचालकांची मागणी : गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीची सर्वसाधारण सभा गोंदिया : कृषी उत्पन्न बाजार समिती मनोहरभाई पटेल मार्केट यार्डमध्ये स्थानांतरित करण्यासह अन्य मागण्यांवर चर्चा करीत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची सर्व साधारण सभा जवळील ग्राम कटंगी येथे शुक्रवारी पार पडली. बाजार समिती सभापती चुन्नीलाल बेंद्रे यांच्या अध्यक्षतेत आयोजित सभेला उपसभापती धनलाल ठाकरे, संचालक सुरेश अग्रवाल, अरूण दुबे, कुंदन कटारे, जगदीशप्रसाद अग्रवाल, अखिलेश सेठ, आनंद तुरकर, तीर्थराज हरिणखेडे, विठोबा लिल्हारे, आशिष नागपुरे, मनोज दहीकर, सावलराम महारवाडे, सुमीत भालोटिया, आशिष चव्हाण, विजय उके, गीता तुरकर, खेमन बिरनवार, कृषक सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष भिकाजी चव्हाण, आडतीया व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रमोद अग्रवाल उपस्थित होते. सभेत सभापती बेंद्रे यांनी, शेतक री व व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवहारात येणाऱ्या समस्या व त्यांचे निराकरण करण्यासाठी समितीकडून करण्यात येत ्असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. दरम्यान उपस्थित संचालकांनी आपल्या विविध मागण्या या सभेत मांडल्या. तसेच विविध विषयांवर या सभेत चर्चा करण्यात आली. संचालन करून प्रास्तावीक बाजार समितीचे प्रभारी सचिव सुरेश जोशी यांनी मांडले. आभार संचालक महारवाडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी आर.एन.अग्रवाल, सचिन बडवाईक, बी.एस. पटले, पी.व्ही.झा, के.एम. चौधरी, जी.डी.पटले, डि.व्ही.राणा, हरीष तिवारी, एस.के.गभने, पी.व्ही. टेंभरे, जी.डी.टेंभूर्णीकर, विजय टोंडरे, नेमीचंद रहांगडाले, एस.टी.तिरोले, संजय मुनेश्वर, ललीत अतकरे आदिंनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
बाजार समिती मार्केट यार्डमध्ये स्थानांतरित करा
By admin | Updated: September 26, 2015 01:58 IST