शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

मामा तलावाचे लाभाधिकार जि.प.गोंदियाकडे हस्तांतरित

By admin | Updated: March 10, 2017 00:38 IST

तालुक्यातील सेलोटपार गट ग्रामपंचायतमधील खैरी येथील ११ हेक्टर जमिनीवरील मामा तलावाची मालकी भंडारा

खैरी येथील तलाव : भंडारा सीईओचे गोंदिया सीईओ यांना पत्र तिरोडा : तालुक्यातील सेलोटपार गट ग्रामपंचायतमधील खैरी येथील ११ हेक्टर जमिनीवरील मामा तलावाची मालकी भंडारा जिल्हा परिषदेकडे होती. जिल्हा वेगळा होवून १७ वर्षे पूर्ण होवूनही तलावाचे विविध लाभ जि.प. भंडारा घेत होते. याबाबत जि.प. सदस्य रजनी मिलिंद कुंभरे यांनी स्थायी समिती जिल्हा परिषद गोंदिया येथे हा मुद्दा उचलून धरला. वारंवार पाठपुरावा करण्याची आग्रही भूमिका घेतली. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले व त्या मामा तलावाचे लाभाधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. गोंदिया यांंना दिल्याचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. भंडारा यांनी दिले.भंडारा व गोंदिया जिल्हा १ मे १९९९ मध्ये वेगळे झाले. नियमानुसार ज्या-ज्या जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात येणारी शासकीय मालमत्ता त्या-त्या जिल्हा परिषदेला देणे गरजेचे होते. परंतु खैरी येथील मामा तलाव ११ हेक्टर जमिनीवर पसरलेला असून त्यावर आतापर्यंत भंडारा जिल्हा परिषदेची मालकी होती. त्या तलावाचे लिलाव भंडारा जि.प. करीत होते. त्याचे सर्व आर्थिक लाभाधिकार भंडारा जिल्हा परिषदेकडे होते. ही गंभीर बाब यापूर्वी अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या निदर्शनास कशी आली नाही, हा संशोधनाचा विषय ठरू शकतो. पण जि.प. सदस्य रजनी कुंभरे यांच्या नजरेतून सुटू शकली नाही. त्यांनी जिल्हा परिषद गोंदियाच्या स्थायी समितीत ही गंभीर बाब उचलून धरली व सतत पाठपुरावा करण्यास आग्रही भूमिका घेतली. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आले व हे मामा तलाव जि.प. भंडाराकडून पत्र (भंजिप/लपा/ता-१/२१४/२०१७, कार्यालय लघू सिंचन विभाग, जि.प. भंडारा, दि.२/२/२०१७) अन्वये हस्तांतरित करून आर्थिक लाभाचे सर्व अधिकार जिल्हा परिषद गोंदियाला देण्यात आले. जिल्हा परिषद गोंदियाच्या मालमता नोंदवहीमध्ये सदर मामा तलावाची नोंद करावे व याप्रमाणे पुढील सर्व कार्यवाही करण्याची नोंद सदर पत्रामध्ये नमूद केली आहे.जिल्हा परिषद सदस्य रजनी कुंभरे यांच्या प्रयत्नांना यश आल्याने जि.प. गोंदियाचे उत्पन्न वाढेल. स्थानिक युवकांना, नागरिकांना रोजगार मिळेल, असे त्यांनी सांगितले.(तालुका प्रतिनिधी)