शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

स्त्रियांच्या विविध आजारांवर ‘जीवनदायी’चा उतारा

By admin | Updated: June 19, 2015 01:21 IST

आजार लपवू नका. प्रारंभी अवस्थेतच रोगनिदान करून घ्या. राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ घ्या.

लाभ घेण्याचे आवाहन : काटी येथे रोगनिदान व उपचार शिबिरगोंदिया : आजार लपवू नका. प्रारंभी अवस्थेतच रोगनिदान करून घ्या. राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ घ्या. गर्भाशयाचे आॅपरेशन, सर्व प्रकारचे कर्करोग, विविध स्त्री रोग आजारांच्या शस्त्रक्रिया बाई गंगाबाई रुग्णालयात प्रसूती तज्ज्ञांमार्फत मोफत करण्यात येतात. याचा पुरेपूर लाभ घ्या, असे आवाहन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अमरीश मोहबे यांनी महिलांना केले. महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत बुधवारी (दि.१७) प्राथमिक आरोग्य केंद्र काटी येथे रोगनिदान व उपचार शिबिर पार पडले. या वेळी ते मार्गदर्शन करीत होते. उद्घाटन बाई गंगाबाई रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे यांच्या हस्ते धन्वंतरी पूजनाने झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून रक्त संक्रमण अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. धाबेकर, बालरोग तज्ज्ञ डॉ. आनंद, आहारतज्ज्ञ डॉ. प्रियंका, गंगाबाईचे जीवनदायी योजनेचे कक्षप्रमुख भस्मे, विशाल टेंभुर्णे आदी उपस्थित होते. राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत रोगनिदान व मोफत उपचार शिबिराबाबत प्रास्ताविक प्राथमिक आरोग्य केंद्र काटीचे डॉ. अमित खोडनकर यांनी केले. स्त्री रोगतज्ञ डॉ. धाबेकर यांनी उपस्थित महिलांना स्त्रियांचे प्रदर रोग, स्तन कॅन्सरबाबत लक्षणे, निदान व उपचाराबाबत सखोल मार्गदर्शन केले. डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी महिलांना आवाहन केले की, चाळीशीनंतर प्रत्येक स्त्रीने गर्भाशय व मुखाचे कॅन्सर होऊ नये म्हणून पॅप्स स्मेअर तपासणी करून घ्यावी. पॅप्स स्मेअरमुळे लवकर निदान होते व गुंतागुंत टळते येते. यानंतर शिबिरात बालरोग तज्ज्ञांमार्फत १२६ बालकांची आरोग्य तपासणी व उपचार करण्यात आले. ४७ गरोदर स्त्रिया व इतर ५४ स्त्रियांची विविध आजारांसाठी मोफत तपासणी व उपचार करण्यात आले. गंभीर आजारी रुग्णांना राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत मोफत उपचारासाठी बाई गंगाबाई रुग्णालयात हलविण्यात आले. कार्यक्रमासाठी डॉ. अमित खोडतकर व प्राथमिक आरोग्य केंद्र काटीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)