शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक व्यवस्थेचे वाजले बारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 20:31 IST

शहरातील वाहतूक व्यवस्थेची घडी सुधारण्यासाठी वाहतूक नियंत्रण विभागाने मागील वर्षी काही प्रयोग राबविले. वाहन चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. मात्र यानंतर याकडे वाहतूक नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष झाल्याने आणि वाहनात बसून ट्राफिक कंट्रोल करण्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचे पूर्णपणे बारा वाजले आहेत.

ठळक मुद्देवाहनात बसून ट्राफिक कंट्रोल : वाहतुकीच्या कोंडीने शहरवासी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील वाहतूक व्यवस्थेची घडी सुधारण्यासाठी वाहतूक नियंत्रण विभागाने मागील वर्षी काही प्रयोग राबविले. वाहन चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. मात्र यानंतर याकडे वाहतूक नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष झाल्याने आणि वाहनात बसून ट्राफिक कंट्रोल करण्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचे पूर्णपणे बारा वाजले आहेत. परिणामी शहरातील मुख्य बाजारपेठेत वाहन चालक आणि पादचारी नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.हावडा मुंबई मार्गावरील प्रमुख रेल्वे स्थानक आणि विदर्भाची मिनी मुंबई म्हणून ओळखले जाणारे गोंदिया शहर वाहतूक व्यवस्थेसाठी मात्र तितकेच चर्चेत असते. शहरातील अस्थाव्यस्त वाहतुकीमुळे पाच मिनिटांचे अंतर कापण्यासाठी अर्धा ते पाऊन तास लागते. यावरुन शहरातील वाहतूक व्यवस्था किती सुरळीत आणि चांगली आहे याची प्रचिती येते.गोरेलाल चौक, दुर्गा चौक, चांदणी चौक, गांधी प्रतिमा, नेहरु चौक, गंज वॉर्ड भाजीबाजार परिसरात शहरातील मुख्य बाजारपेठ आहे. शिवाय याठिकाणी चंद्रपूरपासून ते बालाघाटपर्यंतचे नागरिक विविध वस्तुंची खरेदी करण्यासाठी येथे दररोज येतात. त्यामुळे या परिसरात नेहमीच वर्दळ असते. मात्र शहरातील मुख्य रस्त्यांवर आधीच व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले असल्याने रस्ते अरुंद झाले आहे. तर रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली जात असल्याने ये-जा करण्यासाठी रस्ताच शिल्लक राहत नाही. त्यामुळे अनेकदा या परिसरात वाहतुकीची कोंडी होती. त्याचा मनस्ताप शहरवासीय आणि वाहन चालकांना सहन करावा लागतो. वाहतुकीची कोंडी झाल्यानंतर नागरिकांचा गदरोळ उडतो तेव्हा दूरवर उभे असलेले वाहतूक पोलीस वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी पोहचतात.मात्र तोपर्यंत रस्त्याच्या कडेला उभे राहून हा सर्व प्रकार पाहत असतात. आता तर वाहतूक नियंत्रण विभागाने नवीनच प्रयोग सुरू केला.शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी त्यांनी वाहनात बसून ट्राफीक कंट्रोल करण्यास सुरूवात केली. वाहनात बसून ट्राफीक कंट्रोल करणाऱ्यांना रस्त्यावरुन चालणाºया पादचारी नागरिकांना वाहतुकीच्या कोंडीचा किती त्रास होतो हे कसे कळणार हा सुध्दा विचार करणार प्रश्न आहे.अनेकांनी यावर विनोद देखील केला.एकंदरीत शहरातील वाहतूक व्यवस्थेचे पूर्णपणे बारा वाजले आहे.वन वे पार्किंगचा प्रयोग फसलाशहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी वाहतूक नियंत्रण विभागाने नागपूरच्या धर्तीवर वन वे पार्किंगचा प्रयोग राबविला होता. मात्र यात देखील सातत्याने ठेवण्यात वाहतूक नियंत्रण विभागाला अपयश आले. त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेत वन वे पार्किंगचे फलक लावण्यात आले आहेत. मात्र रस्त्याच्या दुतर्फा उभ्या केल्या जाणाºया वाहनाची स्थिती पाहता हे फलक केवळ नावापुरतेच ठरत आहे.वाहतूक पथदिवे बंदवाहतूक नियंत्रण विभागाने बऱ्याच वर्षांनंतर शहरातील वाहतूक पथदिवे सुरू केले होते. मात्र त्यांच्या देखभाल दुरूस्ती प्रश्न निर्माण झाल्याने वाहतूक पथदिवे सुध्दा बंद पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे.पोलीस अधीक्षक दखल घेणार का?शहरातील विस्कळीत वाहतुकीची घडी सुधारण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक दखल घेवून सुधारणा करतील का असा सवाल शहरवासीयांकडून केला जात आहे. त्यामुळे वाहतूक नियंत्रण विभाग यावर काय तोडगा काढतो याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस