शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचे पथसंचलन

By admin | Updated: September 16, 2016 02:43 IST

शहरात विसर्जनासह सर्व धार्मिक सण, उत्सव शांततेत पार पाडण्याकरिता आम्ही सज्ज आहोत, असा संदेश

पुढच्या वर्षीसाठी साकडे : विसर्जन स्थळांवर एकच गर्दी, निर्माल्य दानासाठी फिरला रथ गोंदिया : ‘गणपती बाप्पा मोरया...’चा जयघोष करीत आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याचे साकडे घालत तमाम गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला गुरूवारी (दि.१५) निरोप दिला. गणरायाच्या विसर्जनाला सुरूवात झाल्याने शहरात सर्वत्र गणपतीच्या मिरवणुकांची धूम दिसत होती. गुरूवारी सर्वाधिक विसर्जन असल्याने विसर्जनस्थळांवर एकच गर्दी झाली होती. त्यामुळे पोलिसांसह आपत्ती निवारण पथक सज्ज होते. रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरळीतपणे सुरू होते. मांगल्य आणि उत्साहाचे प्रतिक असलेल्या गोंदियाच्या गणेशोत्सवाची लगतच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यांतही ख्याती आहे. शहरातील काही मोठ्या मंडळांकडून साजरा करण्यात येणारा उत्सव शहराची शान ठरत आहे. त्यामुळे बाहेरगावहून भाविक शहरातील उत्सव बघण्यास दरवर्षी येतात. ५ सप्टेंंबर रोजी मोठ्या थाटात गणरायांची स्थापना करण्यात आली होती. गणपतीच्या उत्सवाचे हे १० दिवस नवचैतन्याचे भारून गेले होते. त्यामुळेच गणरायाला निरोप देताना भक्तगण भारावून गेले होते. गुरूवारी सकाळपासूनच गणपती विसर्जनाला सुरूवात झाल्याचे बघावयास मिळाले. कुणी हातात, कुणी डोक्यावर, कुणी हातठेल्यांवर, कुणी रिक्षात तर कुणी चारचाकी वाहनांत गणरायांना घेऊन विसर्जनासाठी जात असल्याचे दिसले. यात गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुका आकर्षणाचे केंद्र होत्या. ढोलताशांच्या तालावर नाचत ‘गणपती बाप्पा मोरया...’ चा जयघोष करीत मिरवणुका निघत होत्या. (शहर प्रतिनिधी) पोलिसांचा चोख बंदोबस्त ४विसर्जनाला सुरूवात झाली असून सुरक्षा व व्यवस्थेच्या दृष्टीने शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसून आला. बंदोबस्तांतर्गत चौकाचौकांत पोलीस कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली होती. यासह वाहतूक पोलीसही त्यांच्यासोबत होते. तसेच विसर्जन स्थळांवरही पोलिसांसह होमगार्डचा बंदोबस्त होता. याशिवाय मार्शल पेट्रोलींग तसेच निर्भया पथक व पोलीस निरीक्षकांचे पथक सुद्धा नजर ठेऊन होते. गुरूवारी सर्वाधिक विसर्जन ४व्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस विभागाकडून मंडळांना विसर्जनासाठी दिवस वाटून देण्यात आले आहेत. त्यानुसार १४ तारखेपासूनच विसर्जनाला सुरूवात झाली आहे. तर शेवटचे विसर्जन १९ तारखेला होणार आहे. यात मात्र गुरूवारी (दि.१५) सर्वाधिक विसर्जन करण्यात आले. शहर पोलिसांनी २६ मंडळांना तर रामनगर पोलिसांनी २० मंडळांना विसर्जनाच्या तारखा दिल्या होत्या. शिवाय हजारोंच्या संख्येत खासगी गणपतींचे विसर्जन करण्यात आले.