शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

शहरात वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 01:13 IST

गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुन्या उड्डाणपुलाची दुरूस्ती करण्यासाठी मंगळवारी (दि.१४) हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली.

ठळक मुद्देजुना उड्डाणपूल बंद केल्याचा फटका : नवीन पुलावर अपघाताची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुन्या उड्डाणपुलाची दुरूस्ती करण्यासाठी मंगळवारी (दि.१४) हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. तर नवीन उड्डाणपुलावरुन जड वाहतुकीला बंदी असताना सुध्दा जडवाहने पुलावरुन सुसाट धावत होते. त्यामुळे या पुलावर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.शहरातील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो वाहतुकीसाठी सुरू ठेवणे योग्य नसल्याचे पत्र रेल्वे विभागाने दोनदा जिल्हा प्रशासनाने दिले. त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पाऊले उचलीत यावर उपाय योजना करण्यास सुरूवात केली. जुन्या उड्डाणपुलावरुन वाहतूक पूर्णपणे बंद केल्यास त्याला पर्यायी सुविधा काय, अथवा या पुलावरुन हलकी वाहने जाऊ द्यायची याबाबत सार्वजनिक बांधकाम, वाहतूक नियंत्रण आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सार्वजनिक बांधकाम विभागाने जुन्या उड्डाणपुलावरुन हलकी वाहनांची वाहतूक सुरू ठेवण्यास कुठलीही अडचण नसल्याचे सांगितले.जुन्या उड्डाणपुलावरुन जड वाहने जावू नये, यासाठी हाईट बॅरियर लावण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी मंगळवारी (दि.१४) दिवसभर हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. पुलाची काही ठिकाणी दुरूस्ती सुध्दा करण्यात आली. मात्र जुन्या उड्डाणपुलावरुन वाहतूक पूर्णपणे बंद असल्याने त्याचा फटका शहरवासीयांना बसला.वाहन चालकांना नवीन उड्डाणपुलावरुन वळसा घेवून जयस्तंभ चौक, नेहरु चौकाकडे जावे लागले. त्यामुळे नेहरुचौक व जयस्तंभ चौकात वाहनांची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली. त्यातच नगर परिषदेतर्फे शहरातील रस्त्यांची कामे सुरू असल्याने काही मार्ग बंद आहे.यामुळे वाहतुकीच्या कोंडीत आणखी भर पडली. दरम्यान या प्रकारामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागल्याने त्यांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला.नवीन पूल नावापुरताचजुन्या उड्डाणपुलाला पर्याय म्हणून दोन वर्षांपूर्वी गोंदिया बालाघाट मार्गावर ५४ कोटी रुपये खर्च करुन नवीन उड्डाणपूल तयार करण्यात आला. मात्र या पुलाचे बांधकाम करताना तांत्रिक बाबीकडे दुर्लक्ष झाल्याने ५४ कोटी रुपयांचा हा पूल शहरवासीयांसाठी नावापुरताच ठरत आहे. नवीन उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजुला पादचारी पुलासाठी जागा सोडण्यात आली नाही. तर पुलाचा उतार देखील चुकीचा आहे. त्यामुळे या पुलावरुन जडवाहतुक सुरू ठेवल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.नवीन पुलाचा प्रस्तावजुना जीर्ण तर नवीन उड्डाणपूल सदोष असल्याने गोंदिया बालाघाट मार्गावर नवीन उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात यावे. असा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाकडे पाठविला आहे. त्याची चाचपणी सध्या सुरू असल्याची माहिती आहे.नियमांना डावलून जडवाहतूक सुरूनवीन उड्डाणपुलावरुन एसटी बसेस, ट्रक, स्कूल बसेस व जडवाहनाना प्रवेश बंदी करण्यात आली. पुलाच्या सदोष बांधकामामुळे अपघाताची शक्यता अधिक आहे. त्यामुळे या पुलावरुन जड वाहतुक सुरू ठेवू नये, असा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. मात्र मंगळवारी या पुुलावरुन जडवाहतुक सर्रारपणे सुरू होती. याकडे संबंधित विभागाचे अधिकारी सुध्दा डोळे बंद करुन पाहत होते.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी