शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

व्यापारनगरी होणार भक्तीमय

By admin | Updated: November 2, 2016 00:24 IST

व्यापारनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोंदियात दि.३ पासून एक आठवडाभर प्रसिद्ध भागवत कथाकार ऋतंभरादेवी यांच्या कथा-ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्यापासून भागवत कथायज्ञ : साध्वी ऋतंभरादेवींचे सप्ताहभर बोधामृतगोंदिया : व्यापारनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोंदियात दि.३ पासून एक आठवडाभर प्रसिद्ध भागवत कथाकार ऋतंभरादेवी यांच्या कथा-ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांचे सासरे घनश्याम मसानी यांच्या पुढाकाराने आयोजित या भागवत कथायज्ञामुळे व्यापारनगरी भक्तीमय होणार आहे.कथास्थळी मंगळवारी आयोजित पत्रपरिषदेत यासंदर्भात माहिती देताना संजयसिंग मसानी, विश्व हिंदू परिषदेचे राजू वालिया आणि मधुसूदन अग्रवाल यांनी सांगितले की, हे आयोजन मसानी परिवारातर्फे असले तरी ते केवळ निमित्तमात्र आहेत. वास्तविक हे आयोजन संपूर्ण गोंदियावासीयांचे आहे. शहरवासियांच्या सुख, शांती, समृद्धीसाठी सदर भागवत कथा आयोजित केली आहे. देशातील विविध समाजात दरी वाढत आहे. ही दरी कमी करण्यासाठी, कुटुंबातील आंतरिक क्लेष, तणाव कमी करून आपल्या संस्कृतीची ओळख समाजाला व्हावी यासाठी हे आयोजन केले जात आहे. भरकटत चाललेल्या नवीन पिढीला योग्य मार्ग दाखविण्याचे काम या कथायज्ञातून केले जाणार आहे. त्यामुळे समाजातील सर्व लोकांकडून यासाठी सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.विशेष म्हणजे साध्वी ऋतंभरादेवी यांचे सप्ताहभराचे भागवत विदर्भात पहिल्यांदाच होत असल्यामुळे गोंदियावासीयांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. दररोज दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळात सदर भागवत चालणार आहे.जिल्हाभरातील आणि बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना कथास्थळी पोहोचविण्यासाठी शहरात काही विशिष्ट ठिकाणी वाहनांचीही व्यवस्था केली जाणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)- वैशिष्टयपूर्ण कथामंडपगोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन यार्डसमोरील घाट रोडवर बनविलेल्या ‘वृंदावनधाम’मध्ये हा भागवत कथायज्ञ होणार आहे. यासाठी ९० बाय ३५० फुटांचा मुख्य मंडप (डोंब) राहणार आहे. त्यात १२ हजार लोक एकाचवेळी बसू शकतील. तसेच दोन्ही बाजुंनी ४५ बाय ३५० फुटांचा मंडप उभारण्यात आला आहे. त्यात भाविकांनी कथाकार ऋतंभरादेवींना जवळून पाहता यावे यासाठी एलईडी टीव्हीसुद्धा लावले जाणार आहेत.कथामंडपाचे वैशिष्ट्य विशेष म्हणजे मंडपच्या आतील दोन्ही बाजुने देशातील विविध राष्ट्रपुरूष, संत-महात्मे आणि देवीदेवतांचे फोटो लावण्यात आले आहेत. राष्ट्रपुरूषांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यापासून तर डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्यापर्यंतचे फोटो आहेत.