शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कामगार संघटनांचा २ सप्टेंबरला संप

By admin | Updated: August 25, 2016 00:19 IST

रेल्वे, संरक्षण, वित्तीय संस्था यात अमर्याद विदेशी गुंतवणूक, भविष्य निर्वाह निधी, कामगार विमा व कामगार

गोंदिया : रेल्वे, संरक्षण, वित्तीय संस्था यात अमर्याद विदेशी गुंतवणूक, भविष्य निर्वाह निधी, कामगार विमा व कामगार कायद्यात बदल करण्याच्या नावाखाली कामगार कर्मचारी वर्गाचे हक्क हिरावून घेण्याचे सरकारचे मनसुबे आहेत. नवीन अंशदायी पेंशन योजनेची रक्कम भांडवलदारांच्या तिजोरीत जमा होणार आहे. सरकारने संघटनांसह संवाद साधणेही बंद केले आहे. त्यामुळे देशातील ११ केंद्रीय कामगार संघटनांनी एकत्र येवून २ सप्टेंबर २०१६ रोजी देशव्यापी लाक्षणिक संप करण्याचा निर्णय घेतलेला आहे.केंद्र व राज्य शासनामध्ये नवीन रालोआ सरकार येवून दोन वर्षे लोटली. परंतु पूर्वीच्याच सरकारची धोरणे सध्याचे सरकार पुढे नेत आहे. भांडवलदारांना पोषक व मालकधार्जिने कायदे करण्यात येत आहेत. अंशदायी नवीन पेंशन योजना रद्द करा, सातवा वेतन आयोग सुधारणेसह १ जानेवारी २०१६ पासून लागू करा, १ जानेवारी २०१६ पासून सहा टक्के महागाई भत्ता द्या, खासगीकरण रद्द करा, रिक्त पदे त्वरित भरा, शिवाय शैक्षणिक भत्ता, वैद्यकीय भत्ता, हॉस्टेल भत्ता, पाच दिवसांचा आठवडा, निवृत्ती वय ६० वर्षे करणे आदी प्रलंबित मागण्यांसाठी राज्य शासनातील १९ लाख सरकारी-निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक या संपात सहभागी होतील, असा निर्णय राज्य समन्वय समितीने घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष चंद्रहास चुटे २५ आॅगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता तहसील कार्यालय अर्जुनी-मोरगाव, २ वाजता सडक-अर्जुनी, ४ वाजता गोरेगाव, २६ आॅगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता देवरी, २ वाजता सालेकसा, ४ वाजता आमगाव, २९ आॅगस्ट रोजी ११.३० वाजता तिरोडा व २ वाजता गोंदिया येथील सभेस ते मार्गदर्शन करणार असल्याचे संघटनेचे सरचिटणिस लिलाधर पाथोडे यांनी कळविले आहे.