शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर ट्रॉली उलटून तेंदूपत्ता मजूर ठार

By admin | Updated: June 10, 2015 00:43 IST

तेंदूपत्त्याचे बोद धुलाई करण्यासाठी जात असलेला ट्रॅक्टर उलटल्याने त्यावर असलेला ..

बोंडगावदेवी : तेंदूपत्त्याचे बोद धुलाई करण्यासाठी जात असलेला ट्रॅक्टर उलटल्याने त्यावर असलेला मजूर रामू शंकर मानकर (४२) ठार झाला. हा अपघात सोमवारी दुपारी घडला.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गावातील तीन ट्रॅक्टर तेंदुपत्ता पानाचे बोद धुलाई करण्यासाठी दवडीपार, माडगी तेंदुपत्ता युनिटमधील पोहरा भागात येथील मजुरांसह गेले होते. बोद मांडायला जात असताना ट्रॅक्टर ट्रॉलीसह गराडा गावाच्या परिसरात एकाएकी उलटला. यावेळी ट्रॉलीमध्ये बसलेला रामू मानकर जागीच ठार झाला. सोमवारी दुपारी १.३० वाजतादरम्यान हा अपघात घडला.ज्या ट्रॅक्टरवर रामू बसला होता तो ट्रॅक्टर कोणाच्या मालकीचा होता याबाबत गावात अनेक चर्चा रंगत आहे. ट्रॅक्टर ट्रॉलीखाली रामू दबला असताना त्याचे सहकारी मात्र इतरत्र पळून गेल्याचे गावात बोलल्या जाते. १.३० वाजेच्या दरम्यान अपघात होऊनसुध्दा त्यांच्या पत्नीला व नातलगांना सायंकाळी बातमी सांगण्यात आली. रामू मानकर यांचा मृतदेह शवचिकीत्सा करून गावात मंगळवारी १२ वाजता आणून स्थानिक स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. (वार्ताहर)तिसऱ्याही भावाचा अपघाती मृत्यूगावातील शंकर मानकर यांना ३ मुले होते. रामू, लक्ष्मण व सुरेश अशी त्यांची नावे. त्यांनी मोलमजुरी करून मुलांचा सांभाळ केला. १० वर्षापुर्वी दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा लक्ष्मण याचा बकऱ्या धुताना तळ्यामध्ये बुडून मृत्यू झाला. सर्वात लहान सुरेश याचा गावातील रमाई चौकात ट्रकने धडक मारल्याने ४ वर्षापूर्वी मृत्यू झाला, आता सर्वात मोठा रामू याचा ट्रॅक्टर अपघातामध्ये ८ जून रोजी मृत्यू झाला. तीनही मुलांचे अपघाती मृत्यू झाल्याने शंकर मानकर यांच्यासह संपूर्ण मानकर परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गावात आणि परिसरात याबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.