शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

अनाथांना तीळगुळ वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:33 IST

जन्मदात्या मायबापांना मुकलेल्या मुलांना पोरकेपणा वाटू नये. भारतीय संस्कृतीमधील येणाºया सणाच्या दिवशी त्या अनाथ मुलांच्या चेहºयावर ईतर मुलांप्रमाणे आनंदाची व उत्साहाची चमक राहावी म्हणून गोंदियाच्या सामाजिक कार्यकर्त्या प्रा.डॉ. सविता बेदरकर यांनी मकरसससंक्रांतीच्या दिवशी....

ठळक मुद्देसविता बेदरकर यांचा पुढाकार : अनाथांना मायेची माया

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : जन्मदात्या मायबापांना मुकलेल्या मुलांना पोरकेपणा वाटू नये. भारतीय संस्कृतीमधील येणाऱ्या सणाच्या दिवशी त्या अनाथ मुलांच्या चेहºयावर ईतर मुलांप्रमाणे आनंदाची व उत्साहाची चमक राहावी म्हणून गोंदियाच्या सामाजिक कार्यकर्त्या प्रा.डॉ. सविता बेदरकर यांनी मकरसससंक्रांतीच्या दिवशी अनाथ मुलांच्या घरी येवून त्यांना तीळगुळ व फराळाचे वाटप केले. त्यांच्या सोबत काही क्षण घालवून एकप्रकारे जन्मदात्या मायेची माया देण्याचा विलक्षण योग साधला.परिसरातील बाक्टी, इंझोरी, सोमलपूर व निमगाव येथे अनाथांचे जीवन जगत असलेल्या १३ मुला-मुलींना सर्वोत्तोपरी मदत करण्याचे दायित्व सविता डॉ. बेदरकर यांनी स्विकारले आहे. जन्मदात्या मायबापांचे छत्र हिरावलेल्या अनाथ मुलांना समाजातील दानदात्यांकडून मदत व्हावी ही अपेक्षा अंगीकारुन दैनिक लोकमतच्या माध्यमातून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. लोकमतच्या वृत्ताला वाढता प्रतिसाद मिळून आजही परिरातील १३ अनाथ मुलांना रोख रक्कमेसह अन्नधान्य, किराणा, शालेय साहित्य, गणवेश यासारखी मदत मिळवून देण्यासाठी डॉ. बेदकर प्रयत्नशील आहेत. स्थानिक लोकमत प्रतिनिधीमार्फत त्यांच्या घरापर्यंत साहित्य सामुग्री पोहोचविल्या जात आहे. भारतीय सण व उत्सवा दरम्यान त्यांना जन्मदात्यांची उणीव भासू नये याची काळजी डॉ. बेदरकर घेत असतात.मकरसंक्रांतीच्या दिवशी अनाथ मुलांना एकाकी वाटू नये. त्यांच्या आनंदात उत्साहाची भर पडावी. त्यांच्यासोबत काही वेळ घालवून त्यांच्याशी हितगूज साधून त्यांना जन्मदात्यांचे प्रेम दयावे, मायेची थाप त्यांच्या पाठीवरुन फिरवावी याच अभिलाषेने डॉ. बेदरकर यांनी आपल्या ५ वर्षीय अर्जव धनेंद्र भुरले या मुलासह त्या अनाथांच्या घरी भेट दिली. त्यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस अनाथ मुलांच्या सोबत साजरा केला. निमगाव व बाक्टी येथे अनाथ मुलांना तिळगुळ तसेच फराळाचे वाटप केले.याप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच भानुदास वळगाये, उपसरपंच गुलशन सांगोळे, सदस्य हितेश शहारे, सामाजिक कार्यकर्ते गंगाधर मेश्राम, विक्रम मेश्राम तसेच बाक्टीच्या अनाथ मुलांना मदत मिळविण्यासाठी सामाजिक दायित्व पार पाडणारे जि.प. प्राथमिक शाळेचे शिक्षक कैलाश हांडगे प्रामुख्याने उपस्थित होते. गोंदियावरुन आणलेले साहित्य डॉ. बेदरकर यांच्या हस्ते ११ अनाथ मुलांना वाटप करण्यात आले. तसेच तांदुळ व तेलही दिले.