शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

१३० जि.प.शाळांना जिवंत विद्युत तारांचा स्पर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 21:48 IST

जि.प. च्या शाळांमध्ये गोरगरीबांची मुले शिकत आहेत. गोंदिया जिल्ह्यातील १०४९ पैकी तब्बल १३० शाळेच्या परिसरातून जीवंत विद्युत तारा गेल्या आहेत. वादळ वाऱ्यामुळे किंवा जीर्ण झालेल्या जीवंत वाहिन्या विद्यार्थ्यांच्या अंगावर पडण्याचा धोका होता.

ठळक मुद्देचिमुकल्यांवरील संकट होणार दूर : ऊर्जा मंत्र्यांनी घेतला पुढाकार

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जि.प. च्या शाळांमध्ये गोरगरीबांची मुले शिकत आहेत. गोंदिया जिल्ह्यातील १०४९ पैकी तब्बल १३० शाळेच्या परिसरातून जीवंत विद्युत तारा गेल्या आहेत. वादळ वाऱ्यामुळे किंवा जीर्ण झालेल्या जीवंत वाहिन्या विद्यार्थ्यांच्या अंगावर पडण्याचा धोका होता.चिमुकल्यांवरील हे संकट दूर करण्यासाठी जि.प.चे विरोधी पक्षनेते गंगाधर परशुरामकर यांनी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत ठराव पारीत करवून घेतला. यासंदर्भात रविवारी (दि.१६) ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी शाळांवरील विद्युत वाहिन्या हटविण्यासाठी विद्युत वितरण विभागाच्या अधिकाºयांना निर्देश दिले. त्यामुळे चिमुकल्यांवर संकट टळणार आहे.जिल्हा परिषदे अंतर्गत चालविण्यात येणाºया सुमारे १५० शाळा इमारतीवरुन विजेच्या जिवंत तारा गेल्या आहेत. असून अनेक शाळांच्या आवारातच विद्युत ट्रान्सफार्मर लावलेले आहेत. हवामानाचा बदल पाहता कधीही वादळामुळे एखादी जिवंत तार तुटली तर मोठा अपघात होऊ शकतो. म्हणून इमारतीवरील तारा काढण्यासाठी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेने १० आॅगस्ट २०१७ ला ठराव करुन पाठपुरावा सुरु केला होता. विद्युत विभागाने सर्व्हेक्षण करुन येणाºया खर्चाचे आराखडे तयार केले होते. पण निधी उपलब्ध नसल्याने हा प्रश्न तसाच प्रलंबित होता. परंतु नुकतेच उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निधी उपलब्ध करुन देण्याचे मान्य केल्याने हा प्रश्न मार्गी लागला अशी माहिती जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी दिली.जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सुमारे १३० शाळांच्या इमारतीवरुन विजेच्या वाहिन्या (तार) गेल्या आहेत. कित्येक शाळांच्या आवारात ट्रान्सफार्मर लागले आहेत.शाळांच्या दृष्टीने हे धोकादायक असल्याने ते काढण्यात यावे. असा प्रस्ताव जि.प.च्या सर्वसाधारण सभेत परशुरामकर यांच्यासह इतर सदस्यांनी ठेवला होता. त्यानुसार विद्युत मंडळाने कारवाई सुरु करुन सर्व्हेक्षण तयार केले.वीज मंडळाला या कार्यासाठी ६ कोटी ५० लाख रुपये खर्च अपेक्षीत असल्याचे सांगण्यात आले. एवढा निधी आणायचा कुठून हा प्रश्न जि.प. समोर व वीज कंपनीकडे उभा ठाकला होता. मात्र राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले.तसेच शाळांच्या इमारतीवरुन गेलेल्या विद्युत तारा त्वरीत हटविण्याचे निर्देश वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.६ कोटी ५० लाख खर्च करण्याचे निर्देशउर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे गोंदिया दौऱ्यावर आले असता त्यांनी वीज वितरण कंपनीच्या अडीअडचणीबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वीज वितरण कंपनीचे अधिकारी व जि.प. सदस्यांची संयुक्त सभा बोलावली होती. सभेत सर्वप्रथम जि.प. सदस्य परश्ुरामकर यांनी बावनकुळे यांच्या समोर हा गंभीर प्रश्न उपस्थित केला. त्यावर बावनकुळे यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन वीज कंपनीच्या अधिकाºयांकडून सविस्तर माहिती घेतली. या कामासाठी लागणारे ६ कोटी ५० लाख रुपये पूर्व विदर्भासाठी असलेल्या निधीमधून तातडीने खर्च करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. बावनकुळे यांनी दखविलेली तत्परता व उपलब्ध करुन दिलेला निधी पाहता भविष्यात निर्माण होणारे संकट टळतील असे सांगत परशुरामकर यांनी उर्जामंत्री बावनकुळे यांचे आभार मानले.तिरोडा तालुक्यातील सर्वाधिक शाळांवर वाहिन्याचिमुकल्या विद्यार्थ्यांवर संकट ओढावणाऱ्या जिवंत विद्युत वाहिन्या व ट्रान्सफार्मरची चौकशी केली असता तिरोडा तालुक्यातील ३६ शाळांच्या आवारातून ह्या वाहिन्या गेल्या आहेत. त्या पाठोपाठ अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २५ शाळा, आमगाव २१ शाळा, सडक-अर्जुनी १९ शाळा, सालेकसा १२ शाळा, गोंदिया १० शाळा, देवरी ५ शाळा तर गोरेगाव तालुक्यातील २ शाळा अश्या एकूण १३० शाळांचा समावेश आहे.