शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त समित्यांना व्यसनमुक्तीचा ध्यास

By admin | Updated: May 23, 2017 00:58 IST

महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेला लोकचळवळ प्राप्त झाली. या चळवळीने गावाचे स्वरूप पालटू लागले.

२३३ ग्रामपंचायती : व्यसनमुक्त गावाची संकल्पना राबविणारलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेला लोकचळवळ प्राप्त झाली. या चळवळीने गावाचे स्वरूप पालटू लागले. तंटामुक्त गावानंतर नागरिकांनी आपले गाव आदर्श करण्यासाठी व्यसनमुक्त गावाची संकल्पना सुरू केली. गोंदिया जिल्ह्यातील ५५६ पैकी २३३ ग्रामपंचायती व्यसनमुक्त गावाची संकल्पना राबविण्यास पुढे आल्या आहेत. तंटामुक्त गाव समितीच्या पुढाकाराने गावे व्यसनमुक्तीच्या मार्गावर आहेत.गावात शांतता व सौहार्द नांदावे यासाठी अवैध दारू विक्रेत्यांची दुकाने बंद करून त्यांना सन्मानाच्या रोजगाराकडे वळविले. इतकेच नव्हे, तर आता दारू विक्रीच बंद नाही तर गाव व्यसनमुक्त असावे, यासाठी समित्यांनी पुढाकार घेतला. गोंदिया जिल्ह्यातील ५५६ पैकी २३३ गावे व्यसनमुक्त गावाची संकल्पना राबवीत आहेत. गावात सर्वाधिक वाद दारूमुळे उद्भवतात. जर, जोरू व जमिनीपासून होणारे वाद आता तंटामुक्त मोहिमेमुळे कमी झाले असले, तरी दारूमुळे होणाऱ्या वादांची संख्या अधिक आहे. दारूला गावातून नष्ट करण्यासाठी गावागावांत महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी दारूबंदी समित्या गठित करून आपल्या गावातील अवैध दारू विक्रीची दुकाने बंद केली. दारूबंदी समितीच्या आड होत अवैध दारू विक्रेत्यांनी दारू विक्री केली तर दंड आकारला. वेळ पडल्यास पोलिसांच्या मदतीने त्यांना तुरुंगातही पाठविण्याची तयारी समित्यांनी दाखविली. नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत १२ ग्रामपंचायती आहेत. मात्र यापैकी ८ ग्रामपंचायती व्यसनमुक्त गावासाठी प्रयत्न करीत आहेत. गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत ४५ ग्रामपंचायती आहेत. मात्र यापैकी १८ ग्रामपंचायती व्यसनमुक्त गावासाठी प्रयत्न करीत आहेत. गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत ५ ग्रामपंचायती आहेत. मात्र यापैकी ४ ग्रामपंचायती व्यसनमुक्त गावासाठी प्रयत्न करीत आहेत. केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत १३ ग्रामपंचायती आहेत. मात्र यापैकी ४ ग्रामपंचायती व्यसनमुक्त गावासाठी प्रयत्न करीत आहेत. गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत २९ ग्रामपंचायती आहेत. मात्र यापैकी १३ ग्रामपंचायती व्यसनमुक्त गावासाठी प्रयत्न करीत आहेत. गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत २८ ग्रामपंचायती आहेत. मात्र यापैकी १८ ग्रामपंचायती व्यसनमुक्त गावासाठी प्रयत्न करीत आहेत. रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत ४२ ग्रामपंचायती आहेत. मात्र यापैकी १९ ग्रामपंचायती व्यसनमुक्त गावासाठी प्रयत्न करीत आहेत. देवरी पोलीस ठाण्यांतर्गत २३ ग्रामपंचायती आहेत. मात्र यापैकी ११ ग्रामपंचायती व्यसनमुक्त गावासाठी प्रयत्न करीत आहेत. डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत ५७ ग्रा.पं. आहेत. मात्र यापैकी १८ ग्रा.पं. व्यसनमुक्त गावासाठी प्रयत्न करीत आहेत. अर्जुनी/मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत ४५ ग्रा.पं. आहेत. मात्र यापैकी २३ ग्रा.पं. व्यसनमुक्त गावासाठी प्रयत्न करीत आहेत. चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत ३१ ग्रा.पं. आहेत. मात्र यापैकी १२ ग्रा.पं. व्यसनमुक्त गावासाठी प्रयत्न करीत आहेत. रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत २ ग्रा.पं. आहेत. मात्र यापैकी २ ग्रा.पं. व्यसनमुक्त गावासाठी प्रयत्न करीत आहेत. दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत २९ ग्रा.पं. आहेत. मात्र यापैकी ९ ग्रा.पं. व्यसनमुक्त गावासाठी प्रयत्न करीत आहेत. तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत ७८ ग्रा.पं. आहेत. मात्र यापैकी २९ ग्रा.पं. व्यसनमुक्त गावासाठी प्रयत्न करीत आहेत. आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत ६० ग्रा.पं. आहेत. मात्र यापैकी ३१ ग्रा.पं. व्यसनमुक्त गावासाठी प्रयत्न करीत आहेत. सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत ५७ ग्रा.पं. आहेत. मात्र यापैकी १४ ग्रा.पं. व्यसनमुक्त गावासाठी प्रयत्न करीत आहेत. जिल्ह्यातील २३३ गावांनी व्यसनमुक्तीची धुरा खांद्यावर घेतली आहे.