शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तेंदुपत्ता तुडाई हंगाम ‘फिका-फिका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 21:19 IST

जिल्ह्यातील आठ तेंदूपत्ता युनिटची विक्री अद्याप झालेली नाही. या युनिटची विक्री करण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू असून येत्या सोमवारी (दि.२३) अंतीम लिलाव केला जाणार आहे. विशेष म्हणजे, वन विभागातील अधिकाऱ्यांना या लिलावातून काही अपेक्षा नाही.

ठळक मुद्देआठ युनिटची विक्री नाही : अंतिम लिलाव सोमवारी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील आठ तेंदूपत्ता युनिटची विक्री अद्याप झालेली नाही. या युनिटची विक्री करण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू असून येत्या सोमवारी (दि.२३) अंतीम लिलाव केला जाणार आहे. विशेष म्हणजे, वन विभागातील अधिकाऱ्यांना या लिलावातून काही अपेक्षा नाही. मात्र ही परिस्थिती बघता यंदाचा तेंदुपत्ता तुडाईचा हंगाम ‘फिका-फिका’ राहणार असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात तेंदुपत्ता तुडाई व संग्रहण २८ युनिटच्या माध्यमातून केले जाते. या युनिटच्या लिलावात खरेदीदारांनी फक्त २० युनिट खरेदी करण्यातच रूची घेतली. परिणामी आठ युनिटचा लिलाव झालाच नाही.वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विक्री झालेल्या या २० युनिटमधील १५ युनिटचेच करार खरेदीरदारांनी केले असून पाच युनिटचे करार अद्याप करण्यात आलेले नाही. अचानकच व्यापाºयांनी तेंदुपत्ता युनिट खरेदीत अरूची दाखविल्यामुळे वन विभागाचे अधिकारीही अचंभीत आहेत. यावरून तेंदुपत्ता खरेदी-विक्रीत यंदा वन विभाग व मजुरांना मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचा अंदाज लावला जात आहे.विशेष म्हणजे, यंदा लवकरच पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तर दुसरीकडे उन्हाळा पूर्णपणे आपल्या रंगात आला आहे. असे असतानाही, आतापर्यंत १५ युनिटचे करार झाले आहेत.अशात तेंदुपत्ता तुडाई कधी होणार व कधी संपणार असा प्रश्न पडत आहे. जर पाऊस लवकरच बरसला तर याचा तेंदुपत्ता तुडाईवर परिणाम पडणार. असे झाल्यास मजुरांना मोठे नुकसान होणार आहे.तसेही तेंदुपत्त्याला मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कमी भाव मिळाला आहे. याचाही फटका मजुरांना सहन करावा लागणार आहे.बोनसवरही होणार परिणामयंदा तेंदुपत्त्याला मागील वर्षाच्या तुलनेत कमी भाव मिळाला आहे. शिवाय युनिटही पूर्णपणे विकल्या गेलेले नाही. या दोन्ही बाबी यंदा परिणामकारक दिसून येत आहे. यात, मजुरांच्या बोनसवर तर परिणाम पडणारच शिवाय वन विभागाची तिजोरीही पाहिजे त्या प्रमाणात भरणार नसल्याचे दिसून येत आहे.